64 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विक्रमला कुराडेला सुवर्ण!
अंतिम फेरीत विक्रमने हरियानाचा मल्ल सनी कुमार याला 5-1 ने अस्मान दाखवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
जालंधर (पंजाब) : येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय सिनियर कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजन गटात महाराष्ट्राचा मल्ल विक्रम कुराडेने सुवर्ण पदक पटकावले.
- ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा
विक्रमने पहिल्या फेरीत गुजरातचा मल्ल अकीब शेख याला 8-0 ने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत विक्रमने तेलंगणाचा मल्ल मनिष सिंग याला 8-0 ने पराभव केला.
- जेव्हा रशियाचे सैनिक 'ए वतन ए वतन' हे गीत गातात... (व्हिडिओ)
तिसऱ्या फेरीत राजस्थानचा मल्ल देशराज याला 6-3 पराभव केला. चौथ्या फेरीत विक्रमन आर्मीच्या (SSCB) मनजीतचा 6-0 ने पराभव करत अंतिम फेरीत गाठली. अंतिम फेरीत विक्रमने हरियानाचा मल्ल सनी कुमार याला 5-1 ने अस्मान दाखवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. सध्या विक्रम मध्य रेल्वेत टी.सी. पदावर कार्यरत आहे.
- युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व!
विक्रम सध्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे काकासाहेब पवार (अर्जुन अवॉर्ड विजेते) आणि गोविंद पवार (शिछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष बाळ गायकवाड, संभाजी वरुटे, चंद्रकांत चव्हाण, पै. अनिल चौगुले (सेनादल), पै. तानाजी नरके, नंदगावचे माजी सरपंच शाबाजी कुराडे यांचेही मार्गदर्शन लाभले.