ती गोष्ट धोनीला पटवून द्यायला वेळ लागला नाही; प्रसाद यांनी शेअर केला पाकविरुद्धचा किस्सा

सुशांत जाधव
Friday, 17 July 2020

बॉल आउटचा सराव करायचो तेव्हा काही फलंदाजांनाही गोलंदाजी करण्याची इच्छा असायची. महेंद्रसिंह धोनी, रॉबिन उथप्पा, सेहवाग यात आघाडीवर असायचे, असा किस्साही प्रसाद यांनी शेअर केला. 

मुंबई : भारतीय संघाचे माजी जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी 2007 मधील टी-20 विश्वषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या 'बॉल आउट'संदर्भातील निर्णयामागील कहाणी सांगितली आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला-वहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्धचा सामना बरोबरीत संपल्यानंतर सामन्याचा निकाल हा बॉल आउटमध्ये लागला. यात भारताने बाजी मारली. यावेळी पाकिस्तानी संघाने प्रमुख गोलंदाजांचा वापर केला. दुसरीकडे भारतीय संघाकडून अनियमित गोलंदाज असलेल्या रॉबिन उथप्पा, सेहवाग यांच्यावर भरवसा दाखवण्याच आला. या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काही बसला होता. एवढेच नाही तर धोनीने कमालीचा निर्णय घेतला अशी चर्चाही रंगली होती. मात्र बॉल आउटमध्ये उथप्पा आणि सेहवागच्या हाती चेंडू देण्याची रणनिती ही व्यंकटेश प्रसाद यांची होती. प्रसाद हे त्यावेळी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.  

महेंद्र सिंग धोनी हा शांत व संयमी खेळाडू - मायकल हसी         

भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यासोबतच्या 'डीआरएस विथ ऐश' या युट्यब शोमध्ये व्यंकटेश प्रसाद यांनी क्रिकेटमधील अनेक मुद्यावर मनमोकळ्या गप्पा केल्या. 2007 च्या टी-20 विश्वचषकातील नियमाचे पालन करण्यासाठी आम्ही नव्या नियमाचाही सराव करायचो, असे त्यांनी सांगितले. जेव्हा आम्ही बॉल आउटचा सराव करायचो तेव्हा काही फलंदाजांनाही गोलंदाजी करण्याची इच्छा असायची. महेंद्रसिंह धोनी, रॉबिन उथप्पा, सेहवाग यात आघाडीवर असायचे. सरावादरम्यान कोण सहज यष्टीचा वेध घ्यायचे याचा मला अचूक अंदाज आला होता. त्यामुळेच बॉल आउटवेळी मी उथप्पा, सेहवाग आणि हरभजन यांची निवड केली होती. हे तिघे बॉल आउटमध्ये सहज यष्टीचा वेध घेतील, हे धोनीला मी सहज पटवून दिले होते, असा किस्साही प्रसाद यांनी अश्विनशी बोलताना शेअर केला.  

'हे' क्रिकेटपटू कसोटीत कधीच शून्यावर बाद झाले नाहीत

2007 च्या विश्वचषकात साखळी फेरीत सामना टाय होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकाल हा बॉल आउटच्या नियमानुसार लावण्यात आला. यात भारतीय संघाने बाजी मारली होती. साखळी सामन्यानंतर अंतिम सामन्यातही भारत पाकिस्तान यांच्यातच संघर्षमय लढत झाली होती. यातही भारतीय संघाने  दिमाखदार विजय मिळवत पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला,  


​ ​

संबंधित बातम्या