'फुटबॉलपटू' बोल्ट शुक्रवारी मैदानावर!

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

जमैकाचा विश्‍वविक्रमी धावपटू उसेन बोल्ट फुटबॉलपटू म्हणून शुक्रवारी मैदानावर उतरेल. ऑस्ट्रेलियन लीगमधील सेंट्रल कोस्ट मरीनर्स संघातर्फे तो मित्रत्वाचा सामना खेळेल.

मेलबर्न : जमैकाचा विश्‍वविक्रमी धावपटू उसेन बोल्ट फुटबॉलपटू म्हणून शुक्रवारी मैदानावर उतरेल. ऑस्ट्रेलियन लीगमधील सेंट्रल कोस्ट मरीनर्स संघातर्फे तो मित्रत्वाचा सामना खेळेल.

प्रतिस्पर्धी संघात प्रमुख स्थानिक हौशी फुटबॉलपटू असतील. बोल्ट सध्या कसून सराव करीत आहे. मरीनर्सचे प्रशिक्षक माईक मुल्वी यांनी सांगितले, की "बोल्ट काही मिनिटे खेळण्याची अपेक्षा बाळगू शकतो.' बोल्ट म्हणाला, की "शेवटची 15 ते 20 मिनिटे मैदानावर उतरण्याची अपेक्षा आहे. सज्ज होणे आणि चेंडूवर शक्‍य तेवढ्या वेळा ताबा मिळविणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे' 

बोल्ट 32 वर्षांचा आहे. त्याने एक आठवड्यापूर्वी सराव सुरू केला. तो "लेफ्ट विंगर' म्हणून सराव करीत आहे. माझ्यापाशी बराच वेळ आहे. मी फुटबॉल शिकत राहीन आणि त्यासाठी जिद्दीने सराव सुरू ठेवेन, असेही त्याने सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या