अमेरिकेला लागलेत क्रिकेटचे 'डोहाळे'; T-20 वर्ल्डकपची करायचीय मेजवानी

टीम ई-सकाळ
Wednesday, 10 June 2020

बेसबॉलच्या तुलनेत फुटबॉल, बास्केटबॉल आणि इतर खेळांना याठिकाणी लोकप्रियता मिळत नाही. पण

वाशिंग्टन :जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला आता क्रिकेटचे मैदाना खुणावत असल्याचे दिसते. क्रिकेटशिवाय इतर खेळात मोठ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आघाडीवर असलेल्या अमेरिकेला टी-20 विश्वचषकाच्या यजमानपदाचे 'डोहाळे' लागले आहेत. अमेरिकी क्रिकेट बोर्डाने (यूएसए क्रिकेट) वेस्ट इंडिजसोबत संयुक्तरित्या 2023 टी-20 विश्व चषक स्पर्धेचे यजमानपद मिळायला हवे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. 1994 मध्ये अमेरिकेत फुटबॉल विश्व चषक स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली होती.  या स्पर्धेप्रमाणे टी-20 विश्व चषक स्पर्धेचेही यजमानपद भूषवण्यास आम्ही इच्छू आहोत, असे बोर्डाने म्हटले आहे. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वासही बोर्डाने व्यक्त केला आहे. 

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला!

अमेरिकेत 1994 मध्ये फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.  बेसबॉलच्या तुलनेत फुटबॉल, बास्केटबॉल आणि इतर खेळांना याठिकाणी लोकप्रियता मिळत नाही. पण फुटबॉलवेळी मैदानावर एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. चाहत्यांना फुटबॉलच्या सामन्यांनाही उत्सुफूर्त प्रतिसाद दिला. जवळपास 35 लाख लोकांनी फुटबॉलचे सामने स्टेडियमवर येऊन पाहिले. बीबीसी स्पोर्ट्सने अमेरिकी क्रिकेट के मुख्य कार्यकारी अधिकारी इयान हिगिंस यांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, जर अमेरिकेत टी-२० विश्व चषक स्पर्धा खेळवण्यात आली तर याठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.

कोरोनामुळ ICC ने बदललेल्या नियमाचा फायदा तोटा कुणाला?

अमेरिकेत स्पर्धा घेतली तर प्रत्येक स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याची तिकिटांची विक्री होईल, असा विश्वासही इयान हिंगिस यांनी व्यक्त केला. आयसीसीचे माजी अधिकारी हिंगिस म्हणाले की, याठिकाणी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल. आयसीसीने अमेरिकेला यजमानपद देण्याची हिंमत दाखवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेची पावले क्रिकेटकडे वळत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. मागील वर्षी फ्लोरिडाच्या मैदानात भारत-वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 सामना रंगला होता. या सामन्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता फ्लोरिडाच्या फोर्ट लॉडरहिल स्थित सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्कवर 6 एकदिवसीय आणि 10 टी-20  आंतरराष्ट्रीय सामने खेळवणे नियोजित आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या