धावा पण 'स्मार्ट' बनून : जय बॉकम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 September 2018

ऑलिंपिकपर्यंत मजल मारायची असेल तर धावण्याची सुरवात किशोर अवस्थेपासून सुरू करायला हवी. 50व्या वर्षी सुरू केल्यानंतर तुम्ही ऑलिंपियन बनू शकत नाही. सांघिक खेळात एक खेळाडू चांगला आणि उरलेले दहा कमी पडणारे असतील तर प्रयत्न व्यर्थ ठरतात. धावण्यात मात्र तुमचे यश तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. 

पुणे : "आरोग्याबरोबरच ज्ञान हीसुद्धा संपत्ती आहे. धावणे हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. शास्त्रशुद्ध माहिती मिळवा. त्याद्वारे "स्मार्ट' बना आणि धावा,' असा संदेश अमेरिकी प्रशिक्षक जय बॉकम यांनी दिला. 

"एपी ग्लोबाले'तर्फे "एसआयआयएलसी'मध्ये आयोजित "सायन्स ऑफ रनिंग' या विषयावर त्यांनी सादरीकरण केले. त्या वेळी हौशी, व्यावसायिक धावपटू, संघटक, तरुण-तरुणी, असे विविध पातळ्यांवरील उत्साह प्रेक्षक उपस्थित होते. बॉकम यांनी अमेरिकेतील फ्लॅगस्टाफ या अतीउंचीवरील ठिकाणी अमेरिकेच्या ऑलिंपियन धावपटूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केनियातही जाऊन प्रशिक्षण दिले आहे. 

ऑलिंपिकपर्यंत मजल मारायची असेल तर धावण्याची सुरवात किशोर अवस्थेपासून सुरू करायला हवी. 50व्या वर्षी सुरू केल्यानंतर तुम्ही ऑलिंपियन बनू शकत नाही. सांघिक खेळात एक खेळाडू चांगला आणि उरलेले दहा कमी पडणारे असतील तर प्रयत्न व्यर्थ ठरतात. धावण्यात मात्र तुमचे यश तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. 

धावण्याचे शास्त्र आधुनिक तंत्रज्ञानानुसार विकसित होत गेले. आता ऍपमध्ये अंतर-वेळ-वेग याचे मोजमाप एका क्‍लिकवर करता येते. त्याचवेळी तापमान, अतीउंचीवरील ठिकाणाचा तपशील आदी बाबींनुसार कामगिरीचा वेध घेता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. 

सादरीकरणापेक्षा जास्त वेळ संवाद रंगला. त्यात बोकॅम यांनी आपल्याकडील माहितीचा खजिना खुला केला. प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगा यांची ही भूमी आहे. मला अद्याप याची पुरेशी माहिती नाही, पण श्‍वसनाचे व्यायामप्रकार धावण्यासाठी उपयुक्तच ठरतील, असे ते म्हणाले. 

"एपी ग्लोबाले'चे "सीईओ' विकास सिंग प्रस्तावना केली. त्यांनी सांगितले, की "ट्रेनिंगचा दर्जा, पूरक बाबींचे मूलभूत मुद्दे, मुळात धावण्याआधी स्वतःच्या शरीराची आणि शरीरशास्त्राची माहिती करून घेणे असे टप्पे सुकर होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला. मी स्वतः सात वर्षांपासून जॅक डॅनिएल्स यांच्या "रनिंग फॉर्म्युला'नुसार सराव करीत आहे. जयने उद्योगपतींपासून ऑलिंपियन धावपटूंना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.' 

विकास क्‍लालीटी ऑफ ट्रेनिंग, मूलभूत मुद्दे समजावून घेणे, रनिंगच्याही आधी आपले शरीर, व्हिडिओ. 

जयकृत सादरीकरणाचे प्रमुख मुद्दे 
क्रिकेट पाहण्यासाठी दमसास! : भारतात क्रिकेट हा धर्म असल्याची जय यांना जाणीव आहे. क्रिकेटमध्ये धावावे लागतेच, पण ते पाहण्यासाठी नक्कीच दमसास लागतो, अशी टिप्पणी त्यांनी करताच हशा पिकला. 

विजेते दोनच, बाकीचे? : धावण्याबाबात दृष्टिकोन कसा असावा याविषयी उदाहरण देताना ते म्हणाले, न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये दरवर्षी 40 हजार धावपटू सहभागी होतात. त्यात एक पुरुष आणि एक महिला असे दोघेच जिंकतात. इतर 39 हजार 998 जणांचे काय? तर त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी, कामगिरी उंचावण्यासाठी, गुणवत्तेचा पुरेपूर वापर करण्यासाठी, ती उंचावण्यासाठी धावायला हवे.' 

शास्त्रशुद्ध माहिती हवी : शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखणे, योग्य आहार, शरीरशास्त्र, अशा विविध बाबींची शास्त्रशुद्ध माहिती घेत धावपटूंनी सराव करावा. 

एकदम मॅरेथॉनमध्ये उडी नको : धावणे ही काही एका रात्रीत जमण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे एकदम मॅरेथॉनने सुरवात करता कामा नये. अर्धमॅरेथॉनचे लक्ष्य वस्तुस्थितीला धरून असू शकते. 

शर्यतीआधी किती-कधी खावे : हा निर्णय प्रत्येक धावपटूनुसार बदलतो. सवय, सराव, तयारी, यानुसार ते ठरते. प्रयोगातून, अनुभवातून ते ठरवावे. 

संबंधित बातम्या