मायकल जॉर्डनच्या बुटांना लिलावात मिळाली विक्रमी किंमत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

एअर जॉर्डन-वन हे नाइकी या कंपनीचे बुटांचे पहिले मॉडल मायकल जॉर्डनसाठी खास तयार करण्यात आले होते.

युएसएचा महान बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन याच्या नॅशनल बास्केटबॉल लीग (एमबीए) सामन्यादरम्यान घातलेल्या एअर जॉर्डन या बुटांना लिलावादरम्यान 5 लाख 60 हजार डॉलर (4.2 कोटी) एवढी विक्रमी किंमत मिळाली आहे. बास्केटबॉल खेळाडूंच्या बुटासाठी आजवर देण्यात आलेली सर्वात जास्त रक्कम आहे. लाल-काळ्या रंगात असणारे हे विशेष बुट 1985 साली खास मायकल जॉर्डनसाठी बनवण्यात आले होते. 

जुलै मध्ये झालेल्या लिलावात मून शू या नाइकी कंपनीच्या बुटांचे रेकॉर्ड तोडले आहे, मून शू या बुटांना लिलावामध्ये 37 हजार डॉलर इतकी किंमत मिळाली होती. जॉर्डनने त्याच्या बुटांवर त्याचा स्वाक्षरी देखील केलेली आहे, या बुटांना दिड लाख डॉलर किंमत मिळेल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात मात्र बुटांना त्यापेक्षा अधीक किंम्मत मिळाली. 

एअर जॉर्डन-वन हे नाइकी या कंपनीचे बुटांचे पहिले मॉडल मायकल जॉर्डनसाठी खास तयार करण्यात आले होते. मायकल जॉर्डनने त्याच्या पहिल्या एनबीए मोसमामध्ये हे बुट घातले होते. जगातील सर्वश्रेष्ठ बास्केटबॉल खेळाडूंमध्ये मायकल जॉर्डनचे नाव घेण्यात येते. त्याने एनबीए साठी 15 सिझन खेळले तसेच शिकागो बुल्स संघाकडून खेळताना सहा चॅंम्पियनशीप देखील जिंकल्या.  

 


​ ​

संबंधित बातम्या