US Open : जिगरबाज नदालचा पिछाडीवरून विजय 

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

टेनिसपटू बोपण्णाची दुहेरीत आगेकूच 
भारताच्या रोहन बोपण्णाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत तिसरी फेरी गाठली. फ्रान्सच्या एदुआर्द रॉजर-वॅसेलीन त्याचा जोडीदार आहे. त्यांना 15वे मानांकन आहे. त्यांनी बिगरमानांकित मॅथ्यू एब्डन (ऑस्ट्रेलिया)-जॅक्‍सन विथ्रॉ (अमेरिका) यांना 6-4, 6-4 असे हरविले. पहिल्या फेरीत त्यांनी मार्कोस बघदातीस (सायप्रस)-मिशा झ्वेरेव (जर्मनी) यांना 4-6, 6-3, 6-4 असे हरविले होते. मिश्र दुहेरीत बोपण्णा आणि जर्मनीच्या लॉरी सिग्मंडला कॅटरीना स्रीबॉटनिक (स्लोव्हेनिया)-मायकेल व्हीनस (न्यूझीलंड) यांनी 6-4, 6-4 असे हरविले. दुहेरीत लिअँडर पेसला अमेरिकेच्या जेम्स सेर्रेटॅनीसह पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. फ्रान्सचा जेरेमी चार्डी-फेब्राईस मार्टिन यांच्याकडून ही जोडी 3-6, 4-6 अशी हरली. ज्युनियर एकेरीत विकास सिंगला (क्रमांक 125) पोलंडच्या वोजचीएच मॅरेकने (57) 3-6, 7-5, 6-3 असे पराभूत केले.

न्यूयॉर्क : गतविजेत्या रॅफेल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पिछाडीवरून विजय मिळविला. रशियाच्या कॅरेन खाचानोव याचे आव्हान त्याने 5-7, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) असे परतावून लावले. 

ताकदवान खेळ करणाऱ्या खाचनोवने पहिला सेट जिंकून पकड घेतली होती; पण 32 वर्षीय नदालने 5-7, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) अशी बाजी मारली. 22 वर्षीय खाचनोवने 22 वेळा बिनतोड सर्व्हिस केली. याशिवाय त्याने 66 "विनर्स'ही मारले. तो जागतिक क्रमवारीत 26वा आहे. यापूर्वी चार लढतींत नदालविरुद्ध तो एकही सेट जिंकू शकला नव्हता. चौथ्या सेटमध्ये 5-4 अशा आघाडीस नदालला सर्व्हिस राखण्याची गरज होती; पण त्याला टायब्रेकपर्यंत झुंज द्यावी लागली. हा सामना चार तास 23 मिनिटे चालला. नदालची आता जॉर्जियाच्या निकोलोझ बॅसिलॅश्‍विली याच्याशी लढत होईल. 

स्लोआनीची आगेकूच 
महिला एकेरीतील गतविजेत्या अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सने बेलारूसच्या व्हिक्‍टोरिया अझारेन्काला 6-3, 6-4 असे हरवून चौथी फेरी गाठली. स्लोआनीला तिसरे मानांकन आहे. अझारेन्काने 1-3 अशा पिछाडीवरून 4-3 अशी आघाडी घेतली होती, पण तिला सातत्य राखता आले नाही. 

अन्य लढतींत 15व्या मानांकित बेल्जियमच्या एलिसी मेर्टन्सने 23व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रीकोवाला 6-3, 7-6 (7-4); सातव्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलीनाने चीनच्या वॅंग क्वियांगला 6-4, 6-4; 19व्या मानांकित लॅट्‌वियाच्या अनास्ताशिया सेवास्तोवाने रशियाच्या एकातेरीना माकारोवाला 4-6, 6-1, 6-2; तर 18व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍लेग बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाला 6-3, 6-4; तर आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाने अमेरिकेच्या सोफिया केनीनला 6-4, 7-6 (7-2) असे हरविले. 

विल्यम्स भगिनींच्या लढतीत सेरेनाची सरशी 
विल्यम्स भगिनींच्या लढतीत सेरेनाने व्हिनसला 6-1, 6-2 असे हरविले. संभाव्य विजेत्या रॅफेल नदालने पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर रशियाच्या कॅरेन खाचानोव याला हरविले. 

सेरेनाने एक तास 11 मिनिटांत तीन गेमच्या मोबदल्यात बाजी मारली. 38 वर्षांची व्हीनस आणि 36 वर्षांची सेरेना यांच्यातील ही 30वी लढत होती. सेरेनाने 18वा विजय संपादन केला. सेरेनाने 2013 मध्ये चार्ल्सटनमधील स्पर्धेतही याच फरकाने विजय मिळविला होता. तिने मोठ्या बहिणीवरील मोठ्या विजयाची पुनरावृत्ती केली. चौथ्या गेममध्ये ब्रेक तिने ब्रेक नोंदविला. सलग पाच गेम जिंकत तिने 31 मिनिटांत पहिला सेट जिंकला. 

सेरेनासमोर आता इस्टोनियाच्या काया कानेपीचे आव्हान असेल. कानेपीने पहिल्या फेरीत अग्रमानांकित रुमानियाच्या सिमोना हालेप हिला हरविले होते. त्यामुळे सेरेनासमोर कडवे आव्हान असेल. 

मुलीच्या जन्मानंतर पुनरागमन केल्यापासून हा सामना माझ्यासाठी सर्वोत्तम ठरला. आम्हा बहिणींमधील लढत खेळताना आता वेगळे वाटते. आम्ही 18-19 वर्षांच्या होतो तेव्हापेक्षा हे वेगळे आहे. आम्ही दीर्घकाळ खेळलो. अर्थातच यापुढेही आम्हाला खेळायचे आहे. 
- सेरेना 

आमच्यातील लढतींमधील सेरेनाची ही कामगिरी सर्वोत्तम आहे, याचे कारण मी चेंडू जेमतेम परतावू शकत होते. मी फार खराब खेळ केला असे वाटत नाही, तर सेरेनाने प्रत्येक गोष्ट अचूक केली. तिच्या खेळात नक्कीच चुरस आहे. 
- व्हीनस 

टेनिसपटू बोपण्णाची दुहेरीत आगेकूच 
भारताच्या रोहन बोपण्णाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत तिसरी फेरी गाठली. फ्रान्सच्या एदुआर्द रॉजर-वॅसेलीन त्याचा जोडीदार आहे. त्यांना 15वे मानांकन आहे. त्यांनी बिगरमानांकित मॅथ्यू एब्डन (ऑस्ट्रेलिया)-जॅक्‍सन विथ्रॉ (अमेरिका) यांना 6-4, 6-4 असे हरविले. पहिल्या फेरीत त्यांनी मार्कोस बघदातीस (सायप्रस)-मिशा झ्वेरेव (जर्मनी) यांना 4-6, 6-3, 6-4 असे हरविले होते. मिश्र दुहेरीत बोपण्णा आणि जर्मनीच्या लॉरी सिग्मंडला कॅटरीना स्रीबॉटनिक (स्लोव्हेनिया)-मायकेल व्हीनस (न्यूझीलंड) यांनी 6-4, 6-4 असे हरविले. दुहेरीत लिअँडर पेसला अमेरिकेच्या जेम्स सेर्रेटॅनीसह पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. फ्रान्सचा जेरेमी चार्डी-फेब्राईस मार्टिन यांच्याकडून ही जोडी 3-6, 4-6 अशी हरली. ज्युनियर एकेरीत विकास सिंगला (क्रमांक 125) पोलंडच्या वोजचीएच मॅरेकने (57) 3-6, 7-5, 6-3 असे पराभूत केले.

​ ​

संबंधित बातम्या