US Open : जोकोविच, फेडरर बाद फेरीत 

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

महिलांत धक्‍क्‍यामागून धक्के 
पुरुष विभागात बहुतेक मानांकित खेळाडू आगेकूच करत असताना महिला विभागात धक्कातंत्र कायम राहिले आहे. विंबल्डन विजेती आणि चौथी मानांकित अँजेलिक केर्बर ही आणखी एक मानांकित खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडली. स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका शिबुल्कोवाने तिचे आव्हान 3-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. तिची गाठ आता गतवर्षी अंतिम फेरी गाठणाऱ्या मेडिसन किज हिच्याशी पडेल. तिने सर्बियाच्या ऍलेक्‍झांड्रा कुर्निच हिचा 4-6, 6-1, 6-2 असा पराभव केला. महिला विभागात यापूर्वीच अव्वल मानांकित सिमोना हालेप आणि द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. 

न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांनी सफाईदार विजयासह यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. 

जोकोविचने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केचा 6-2, 6-3, 6-3 असा पराभव केला. जोकोविचचा गास्केविरुद्धच्या 14व्या लढतीत तेरावा विजय ठरला. जोकोविचची गाठ आता स्वप्नवत घोडदौड करणाऱ्या पोर्तुगालच्या बिगरमानांकित जाआओ सौसा याच्याशी पडणार आहे. त्याने फ्रान्सच्या लुकास पौले याचे आव्हान 7-6(7-5), 4-6, 7-6(7-4), 7-6(7-5) असे मोडून काढले. 

फेडररने ऑस्ट्रेलियाच्या बॅड बॉय निक किर्गिओस याचे आव्हान 6-4, 6-1, 7-5 असे संपुष्टात आणले. फेडररच्या खेळातील सातत्य आणि अचूकता यापुढे किर्गिओस निष्प्रभ ठरला. आता अमेरिकन स्पर्धेत 13 व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी फेडररसमोर ऑस्ट्रेलियाच्याच जॉन मिलमॅनचे आव्हान असेल. त्याने प्रथमच बाद फेरीपर्यंत आगेकूच करताना कझाकिस्तानच्या मिखाईल कुकुशकिन याचा प्रतिकार 6-4, 4-6, 6-1, 6-3 असा मोडून काढला. 

महिलांत धक्‍क्‍यामागून धक्के 
पुरुष विभागात बहुतेक मानांकित खेळाडू आगेकूच करत असताना महिला विभागात धक्कातंत्र कायम राहिले आहे. विंबल्डन विजेती आणि चौथी मानांकित अँजेलिक केर्बर ही आणखी एक मानांकित खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडली. स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका शिबुल्कोवाने तिचे आव्हान 3-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. तिची गाठ आता गतवर्षी अंतिम फेरी गाठणाऱ्या मेडिसन किज हिच्याशी पडेल. तिने सर्बियाच्या ऍलेक्‍झांड्रा कुर्निच हिचा 4-6, 6-1, 6-2 असा पराभव केला. महिला विभागात यापूर्वीच अव्वल मानांकित सिमोना हालेप आणि द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. 

​ ​

संबंधित बातम्या