गोंगाट्यात खेळण्यासाठी क्लबने आखली योजना; 20000 चाहत्यांची होणार मोफत चाचणी

सुशांत जाधव
Sunday, 12 July 2020

जर्मनीतील फुटबॉल यूनियन बर्लिन क्लबने याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांनी गजबजलेल्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यासाठी ते उत्सुक आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून खेळ जगतात पसरली शांतता दूर करुन पर्वीसारखी गजबज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. कोरोनाजन्य संकटातून सावरताना अनेक ठिकाणी प्रेक्षकांशिवाय स्पर्धेला परवानगी देण्यात आली. काही देशांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवून आणि योग्य त्या खबरदारीसह मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला जावा, असा निर्णयही घेण्यात आलाय. खेळाडू मैदानात परतत असले तरी प्रेक्षकांचा पूर्वी दिसणारी गर्दी कधी आणि कोणत्या स्टेडियमवर दिसणार याबात अद्यापही अनिश्चितता आहे.  जर्मनीमध्ये प्रेक्षकांना पुन्हा मैदानाकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. जर्मनीतील फुटबॉल यूनियन बर्लिन क्लबने याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांनी गजबजलेल्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यासाठी ते उत्सुक आहेत.

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा   आणि लाइकसह शेअर करायलाही विसरु नका  

सामन्यासाठी प्रेक्षकांची गर्दी व्हावी यासाठी क्लबने चक्क 20 हजार फुटबॉल चाहत्यांची कोरोना टेस्ट मोफत करण्याची तयारी दर्शवली आहे.  यूनियन बर्लिनने बुंदेस लीगामधील सामन्यासाठी ही तयारी केली आहे. 22,012 प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये घेण्यात येणाऱ्या सामन्यावेळी यूनियन बर्लिन क्लब अनोखा उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. खेळाडू, स्टाफसह प्रेक्षकांचीही कोरोना चाचणी घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. क्लबने दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियमध्ये प्रेवश करण्यासाठी 24 तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिवार्य असेल. ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे त्याला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. तिकीटासोबत कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्रेक्षकांना सोबत घेऊन जावे लागेल. क्लब नव्या हंगामाच्या सुरुवातीच्या घरच्या मैानातील सामन्यात ही योजना लागू करणार आहे.

किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

इतर फुटबॉल सामन्यावेळी सीटमध्ये अंतर ठेवून बसण्याला परवानगी देण्यात आली होती. यूनियन क्लबची आसन व्यवस्था थोडी इतरांच्या तुलनेत वेगळी असते. त्यांच्याकडे छतावर एकत्रित बसूनही लोक फुटबॉल सामन्याचा आनंद घेतात. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे फुटबॉलसह इतर खेळाला मोठा फटका बसला आहे. यातून सावरत फुटबॉलपटू मैदानात उतरले असलेत तरी फुटबालच्या चाहत्यांना  स्टेडियमवर एन्ट्रीवर निर्बंध आहेत. यामुळे ज्या चाहत्यांना निराश झाले आहेत त्यांना हा प्रयोग दिलासा देणारा असाच आहे.   


​ ​

संबंधित बातम्या