ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट वर कोरोनाचे सावट

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून, ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामान्यांची मालिका खेळणार आहे. त्यातील मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरी कसोटी बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून खेळवण्यात येणार होती. मात्र या भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आता बॉक्सिंग डे कसोटीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.  

कोरोना विषाणूच्या महामारीमूळे जगभरात उद्योग व्यवसायापासून सगळ्याच क्षेत्राची वाताहत झालेली आहे. खेळ जगतातील स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. त्यानंतर तब्बल दोन ते तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रीडा क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून, ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामान्यांची मालिका खेळणार आहे. त्यातील मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरी कसोटी बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून खेळवण्यात येणार होती. मात्र या भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आता बॉक्सिंग डे कसोटीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.  

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?   
 

कोरोना काळानंतर क्रिकेटचे पर्व पुन्हा सुरु होत आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी डिसेंबर मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन संघातील पहिला कसोटी सामना 3 डिसेंबर पासून खेळवला जाणार आहे. तर यामध्ये मेलबर्न येथे होणारा तिसरा कसोटी सामना बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून नियोजित करण्यात आला आहे. परंतु सोमवारी 29 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे या बॉक्सिंग डे कसोटीवर अनिश्चिततेचे काळे ढग पसरले आहेत. व्हिक्टोरिया या भागात एकाच दिवसात 75 कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे क्वीन्सलँड राज्यातील अधिका्यांनी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना इतरत्र खेळवण्यात यावा अशी मागणी अनेक जणांनी केली आहे. 

ला लिगा : लियोनल मेस्सीने केला ७०० वा गोल, मात्र सामना अनिर्णित 

याआधी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने देखील, बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न व्यतिरिक्त इतर ठिकाणी घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच काल मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात, ऑगस्टमध्ये होणारी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याचे चित्र समोर आले होते. तर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियात 7 हजार 920 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. आणि 104 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.            

 


​ ​

संबंधित बातम्या