देशांतर्गत क्रिकेटमधील अनिश्चितता; प्रशासकावर आली राजीनाम्याची वेळ

टीम ई-सकाळ
Sunday, 19 July 2020

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) क्रिकेट ऑपरेशन्सचे व्यवस्थापक सबा करीम यांना आपल्या पदावरून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची पुष्टी मिळाली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) क्रिकेट ऑपरेशन्सचे व्यवस्थापक सबा करीम यांना आपल्या पदावरून राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची पुष्टी मिळाली आहे. 

या कारणामुळे इंग्लंडची सामन्यावर पकड मिळवण्याची मोठी संधी हुकली

कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर देशांतर्गत क्रिकेटसाठी कोणताही ठोस आराखड्याचे नियोजन करू शकले नसल्यामुळे सबा करीम यांना आपल्या पदाचा त्याग करण्यासाठी कळवण्यात आल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भारतासाठी एक कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळणार्‍या सबा करीम यांची डिसेंबर 2017 मध्ये व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाच्या काळानंतर घरघुती क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी करीम यांच्या नियोजनावर बीसीसीआय समाधानी नसल्यामुळेच त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे कळते. सबा करीम यांना बीसीसीआयने आपल्या पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात कोणतेही औपचारिक निवेदन दिलेले नाही. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्याबाबत कोणतीही कृती योजना 52 वर्षीय सबा करीम तयार करू शकले नसल्याने त्यांना पदाचा त्याग करण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले आहे.    

भारतीय क्रिकेटरच्या 'किस' ची ही स्टोरी तुम्ही 'मिस'तर नाही ना केली   

दरम्यान, या महिन्याच्या सुरवातीला बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी देखील आपल्या पदावरून राजीनामा दिला होता. तर मागील वर्षात सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य वित्तीय अधिकारी संतोष रंगणेकर यांनीही आपल्या पदाचा त्याग केला होता. कोरोनाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच घरघुती क्रिकेट देखील मागील चार महिन्यांपासून पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.       

 


​ ​

संबंधित बातम्या