इंग्लंडने करून दाखवले आणि जिंकवूनही दाखवले

शैलेश नागवेकर 
Friday, 31 July 2020

कसोटी आणि वनडेसाठी दोन वेगवेगळे संघ

लंडन : कोरोनाचे संकटानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करणाऱ्या इंग्लंडच्या कसोटी संघाने वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका जिंकली आता त्यांच्या एकदिवसीय संघाने आयर्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना सहा विकेटने जिंकला. या मालिकेतून इंग्लंडने दोन वेगवेगळ्या प्रकारात दोन वेगवेगळे संघ खेळवता येऊ शकतात हे सिद्ध केले. कोरोनाचे सावट कायम असतानाही इंग्लंडने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे पुनरागमन करण्यात आघाडी घेतली. गेले चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबलेले असल्यामुळे पुढील काळात बॅकलॉक भरून काढण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे त्यासाठी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी वेगवेगळे संघ तयार करण्याचा पर्याय पुढे आला होता. 

ENGvsIRE :अनलॉक ODI मधील कमालीचा योगायोग!

इंग्लंडकडे कसोटीत ज्यो रूट आणि एकदिवसीय सामन्यात इऑन मॉर्गन असे दोन कर्णधार आहेत. मॉर्गनच्या या संघाने आयर्लंडवर सहज मात करताना त्यांना कसोटी सामन्यात खेळलेला सर्वोत्तम अष्टपैलू बेन स्टोक्‍सची उणिव जाणवली नाही. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा डाव इंग्लंडने 44.4 षटकांत 172 धावांत गुंडाळला. पुनरागमनाची संधी मिळालेल्या डेव्हिड विलीने 30 धावांत पाच विकेट मिळवले. 7 बाद 79 अशा घसरगुंडीनंतर आयर्लंडचा डाव कर्टिस कॅंफर आणि अँडी मॅकब्रायन यांना सावरला . इंग्लंडने हे आव्हान 27.5 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. सॅम बिलिंगने अर्धशतकी खेळी केली तर कर्णधार मॉर्गनने नाबाद 36 धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामने शनिवारी आणि तिसरा सामना 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर 5 तारखेला इंग्लंडचा इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. 

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही
 

संक्षिप्त धावफलक : आयर्लंड : 44.4 षटकांत 172 (केविन ओब्रायन 22, कॅंफर 59, मॅकब्रायन 40, डेव्हिड विली 30-5, सादिक महम्मद 36-2) पराभूत वि. 27.5 षटकांत 4 बाद 174 (जेसन रॉय 24, सॅम बिलिंग नाबाद 67, इऑन मॉर्गन नाबाद 36)


​ ​

संबंधित बातम्या