INDvsSA : संघाlतून हाकलंल होतं तरी शेवटी ब्रेक थ्यू त्यानंच मिळवून दिला ना!

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक बदल केला. हनुमा विहारीच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले. त्यानेही आपली उपयुक्तता गोलंदाजीला सुरवात झाल्यावर पहिल्याच षटकात सिद्ध केली.

INDvsSA : विराटचा हायेस्ट स्कोअर; सचिन, सेहवागलाही केले ओव्हरटेक

भारताच्या गोलंदाजीला सुवात झाल्यावर उमेशने डावाच्या दुसऱ्याच षटकात एडन मार्करमला शून्यावर बाद केले. दुसऱ्या षटका्चाय दुसऱ्या चेंडूवर त्याने मार्करमला पायचित केले. 

उमेशने अत्यंत सुंदर इनस्विंगर टाकत त्याला चकवले. मार्करमने डाऊन दी लाईन खेळत स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला. दरम्यान भारताने कोहलीच्या 254 धावा आणि जडेजाच्या 91 धावांच्या जोरावर 601 धावांचा डोंगर रचला आणि अखेर डाव घोषित केला. त्यानंतर उमेशने चौथ्या षटकात डीन एल्गरलाही बाद केले.

कसोटी कारकिर्दीत सातव्या द्विशतकासह विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा उच्चांक पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने ही कामगिरी केली. याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांचा उच्चांक पार केले. सचिन आणि सेहवाग यांनी प्रत्येकी सहा द्विशतके काढली होती.

​ ​

संबंधित बातम्या