यूएफा नेशन्स लीग : पिछाडीवरून इटलीची पोलंडशी बरोबरी 

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

बोलोग्ना : रॉबर्टो मॅन्सिनी यांच्या इटली मार्गदर्शकपदाच्या कारकिर्दीस बरोबरीने सुरुवात झाली. इटलीने सुरुवातीच्या पिछाडीनंतर यूएफा नेशन्स लीगमध्ये पोलंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. 

माजी जगज्जेत्या इटलीस विश्‍वकरंडकाची पात्रताही साध्य झाली नव्हती. त्यानंतर मॅन्सीनी यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. त्यांनी या बरोबरीनंतरही अजून खूप काम शिल्लक असल्याचे सांगितले. पहिलीच महत्त्वाची लढत आहे, त्यामुळे काही चुका होणे स्वाभाविक असते; मात्र एकंदरीत समाधानकारक खेळ झाला. प्रतिस्पर्धी पोलंड सध्या जास्त स्थिरावलेले आहेत. उत्तरार्धात चुका कमी केल्यामुळे बरोबरी साधू शकलो, असे त्यांनी सांगितले. 

इटलीचा जम बसण्यापूर्वीच झिएलिनस्की याने पोलंडचे खाते उघडले होते. त्यानंतर इटलीच्या चाहत्यांनी संघाची हुर्यो उडवली; पण बदली खेळाडू फेडरिको चिएसा याला अवैधरीत्या रोखल्यामुळे इटलीस उत्तरार्धात पेनल्टी किक लाभली. जॉर्गिन्होने इटलीस अ विभागातील या लढतीत बरोबरी साधून दिली. इटलीचा स्टार मारिओ बालोतेली याला सुरुवातीस मैदानात उतरविण्यात आले; पण त्याला एका तासाने बदलण्यात आले. त्याच्याऐवजी आलेला आंद्रे बेलोत्ती आणि चिएसा यांचा सूर चांगला जुळला आणि त्यांनी पोलंड बचावफळीवर दडपण आणले होते. त्यातूनच गोल झाला. चिएसा याने पोलंडचा गोल रोखण्यातही मोलाची कामगिरी बजावली. 

दरम्यान, विश्‍वकरंडकात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रशियाने ब विभागात तुर्कीचा 2-1 असा पाडाव केला, तर क विभागात अल्बानियाने इस्रायलचा आणि सर्बियाने लिथुआनियाचा 1-0 असा पाडाव केला. 

लुईस सुआरेझचे दोन गोल 
ब्युनोस आर्यस : लुईस सुआरेझच्या दोन गोलमुळे उरुग्वेने मेक्‍सिकोला सराव लढतीत 4-1 असे पराजित केले, तर विश्‍वकरंडकातील अपयश विसरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अर्जेंटिना तसेच ब्राझीलने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अर्जेंटिनाने ग्वाटेमालाचा 3-0 धुव्वा उडवला, तर ब्राझीलने अमेरिकेस 2-0 नमविले. 

विश्‍वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सविरुद्ध पराजित झालेल्या उरुग्वेने हुकमत राखली. सुआरेझने नऊ मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. लिओनेल मेस्सीविना खेळणाऱ्या अर्जेंटिनाचाही क्वचितच कस लागला. ऍटलेटिको माद्रिदचे मार्गदर्शक दिएगो सिमॉन यांचा मुलगा गिओवानी याचा गोल हे अर्जेंटिनाच्या विजयाचे वैशिष्ट्य. वर्ल्डकप अपयशानंतर अर्जेंटिना अजूनही कायमस्वरूपी मार्गदर्शकाच्या शोधात आहे. सध्या ही जबाबदारी लिओनेल शालोनी पार पाडत आहेत. रॉबर्टो फिर्मिनो आणि नेमारच्या गोलमुळे ब्राझीलने बाजी मारली.

​ ​

संबंधित बातम्या