यूएफा नेशन्स लीग : जर्मनी-फ्रान्सची गोलशून्य बरोबरी 

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

म्युनिक : राखीव गोलरक्षक अल्फोन्सो ऍरेओ याच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे जगज्जेत्या फ्रान्सने यूएफा नेशन्स लीगच्या अव्वल "अ' विभागातील साखळी लढतीत जर्मनीस गोलशून्य बरोबरीत रोखले. विश्‍वकरंडक जिंकल्यानंतरच्या पहिल्या लढतीत फ्रान्सला हार टाळल्याचेच समाधान जास्त होते. 

म्युनिक : राखीव गोलरक्षक अल्फोन्सो ऍरेओ याच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे जगज्जेत्या फ्रान्सने यूएफा नेशन्स लीगच्या अव्वल "अ' विभागातील साखळी लढतीत जर्मनीस गोलशून्य बरोबरीत रोखले. विश्‍वकरंडक जिंकल्यानंतरच्या पहिल्या लढतीत फ्रान्सला हार टाळल्याचेच समाधान जास्त होते. 

जोरदार पावसात झालेल्या या लढतीत साखळीत तळाला गेलेल्या जर्मनीने चाहत्यांना चांगल्या खेळाचे समाधान दिले. त्याच वेळी फ्रान्सच्या खेळात वेग; तसेच धक्कादायक चालींचा अभाव होता. उत्तरार्धात जर्मनीची प्रभावी आक्रमणे ऍरेओने रोखत फ्रान्सला बरोबरीचा गुण मिळवून दिला. ऍरेओ सोडल्यास विश्‍वकरंडक अंतिम लढत खेळलेल्या संघातील सर्व खेळाडू फ्रान्स संघात होते. या स्पर्धेत युरोपातील 55 संघांची चार विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यातील "अ' विभागातील सर्वोत्तम संघ विजेता होईल. 

आमच्यातील लढत कायम चुरशीची होती. आमचे खेळाडू पूर्ण तंदुरुस्त नव्हते. जर्मनीविरुद्धची बरोबरी हीसुद्धा चांगली कामगिरीच असते, असे फ्रान्सचे मार्गदर्शक दिदिएर देशॅम्प यांनी सांगितले. भक्कम बचाव जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांना सुखावत होता. त्यांनी विश्‍वकरंडकातून धडा घेत मधली फळी जास्त भक्कम केली होती. त्यामुळे फ्रान्स आक्रमणावर मर्यादा आल्या होत्या. आता या स्पर्धेत फ्रान्सची रविवारी लढत नेदरलॅंडविरुद्ध होईल. 

बेलचा गोल निर्णायक 
पॅरीस : गेरार्थ बेलच्या गोलच्या जोरावर वेल्सने आयर्लंडला 4-1 असे हरविले. याच "ब' विभागात युक्रेनने चेक प्रजासत्ताकचा पिछाडीवरून 2-1 असा पाडाव केला. स्टीफन जॉन्सनच्या दोन गोलमुळे "क' विभागात नॉर्वेने सायप्रसला 2-0 हरविले.
 


​ ​

संबंधित बातम्या