आयपीएलमध्ये खेळाडू नाहीत तर `यांची` संख्या कमी होऊ शकते

शैलेश नागवेकर 
Friday, 31 July 2020

प्रत्येक संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची संख्या किती असावी हा मुद्दा आमच्या लक्षात आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीत यासह इतरही सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे आयपीएल प्रशासकीय समितीचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

मुंबई : कोरोना संसर्गाची भिती आणि जैव सुरक्षा व्यवस्थेचे नियम यामुळे अमिरातीत होणाऱ्या यंदाच्या आयपीएलमध्ये संघातील खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ यांची संख्या कमी होण्याची शक्‍यता आहे. साधारतः प्रत्येक संघात सरासरी 25 खेळाडू आणि 10 ते 12 सपोर्ट स्टाफची संख्या असते. पण यावेळी जैव सुरक्षा व्यवस्थेची तटबंदी असल्याने बीसीसीआय प्रत्येक संघांना खेळाडूंची संख्या मर्यादित ठेवण्यास सांगण्याची शक्‍यता आहे. 20 पेक्षा अधिक खेळाडू नसावेत असे बीसीसीसीआयचे म्हणणे आहे. 

 ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही

बहुतेक फ्रॅंचाईस खेळाडूंची संख्या कमी करण्यात तयार नाहीत. स्पर्धेचा कालावधी आणि दुखापतींची शक्‍यता यासाठी पर्याय उपलबद्ध रहावेत यासाठी खेळाडूंची संख्या कायम ठेवण्यावर फ्रॅंचाईस ठाम आहेत मात्र सपोर्ट स्टाफची कपात करण्याची तयारी ते दाखवत आहेत. 2014 मध्येही अमिरातीत झालेल्या आयपीएलमध्ये सपोर्ट स्टाफ कमी केलेल्या एका फ्रॅंचाईच प्रतिनिधीने सांगितले.सर्वसाधपणे आयपीएलच्या मध्यावर प्रत्येक फ्रॅंचाईस आपापल्या संघाचा आढावा घेत असतो आणि जे खेळाडूंना पुढील सामन्यात खेळण्याची शक्‍यता कमी असते त्यांना रिलिज करत असतात, यंदाचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. तसेच स्पर्धेस सुरुवात झाल्यानंतर आम्ही याबाबत विचार करु असे काही फ्रॅंचाईसचे म्हणणे आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

प्रत्येक संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची संख्या किती असावी हा मुद्दा आमच्या लक्षात आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीत यासह इतरही सर्व मुद्यांवर चर्चा होईल, असे आयपीएल प्रशासकीय समितीचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. संघांच्या तयारीसाची बहुतेक फ्रॅंचाईस ऑगस्टच्या मध्यावर दुबईत जाण्याचा विचार करत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या