Pro Kabaddi : अभिषेक बच्चनच्या जयपूर संघाचा मुंबईविरुद्ध एकतर्फी विजय

शैलेश नागवेकर
Monday, 22 July 2019

दीपक हुडाला पहिल्याच चढाईत पकड करण्यासाठी केलेली घाई यू मूम्बासाठी संकटात नेणारी ठरली. त्यामुळे त्यांची लय हरपली आणि त्याचा फायदा घेत अभिषेक बच्चन यांनी जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डीत 42- 22 अशा विजयासह जोरदार सलामी दिली.

प्रो-कबड्डी
हैदराबाद ः दीपक हुडाला पहिल्याच चढाईत पकड करण्यासाठी केलेली घाई यू मूम्बासाठी संकटात नेणारी ठरली. त्यामुळे त्यांची लय हरपली आणि त्याचा फायदा घेत अभिषेक बच्चन यांनी जयपूर पिंक पँथरने प्रो कबड्डीत 42- 22 अशा विजयासह जोरदार सलामी दिली.

कबड्डी हा खेळ जोशाचा तसा संयमाचाही आहे. तसेच लय मिळवण्याचाही आहे. दोन दिवसांपूर्वी पहिला सामना जिंकणाऱ्या मूंबईने संयम आणि लय दोन्ही गमावली. जागतिक कबड्डीतील सर्वोत्तम बचावपटू इराणचा फझल अत्राचली तसेच दुसरा कोपरा संदीप नरवाल असा बचाव असतानाही मुंबईचा बचाव केवळ घाई केल्यामुळे अस्थिर झाला. 

सामन्याची पहिली चढाई जयपूरचा दीपक हुडा करत होता त्याला पकडण्याची घाई केली त्यात दोन खेळाडू गमावले. त्यानंतर ही भरपाई करण्याच्या प्रयत्नात आणखी चुका केल्या त्यामुळे पूर्वार्धात दोन लोण आणि 9-22 अशी पिछाडी स्वीकारण्याची वेळ आली.

जयपूरच्या नितील रावतसारख्या नवखा चढाईपटू फझल आणि संदीप यांच्या पकडीतून सुटत होता. जेव्हा या हुकमी खेळाडूंचे काही चाले नासे झाले तेव्हा मुंबई संघाचे आक्रमणही कमकूवत ठरू लागले होते. रोहित बलियान आणि अभिषेक सिंग या हमखास गुण मिळवणाऱ्या चढाईपटूंच्या पकडी जयपूरचे दीपक आणि अमीत हे हुडा बंधू करू लागले. त्यामुळे गुणांचा ओघ आटू लागला. 

उत्तरार्धात सुरु झाल्यानंतर मुंबई संघ सावरत असल्याचे दिसून आले. भरपाई करण्यासाठी अचुकता आणण्याचा प्रयत्न केला, पिछाडी 19-28 अशी कमीही केली अखेरची पाच मिनिटे शिल्लक असाना जयपूरकडे दोनच खेळाडू होते. पण यावेळीबी दीपक हुडाच्या डू ऑर डायच्या चढाईत त्याला पकडण्याचा फझलचा प्रयत्न चुकला लोण देण्याची संधी गमावली उलट स्वतःवर लोण स्वीकारला.


​ ​

संबंधित बातम्या