चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यापूर्वीच अ‍ॅटलेटिकोच्या दोघांना कोरोनाचा संसर्ग  

टीम ई-सकाळ
Monday, 10 August 2020

स्पॅनिश फुटबॉल क्लब मधील अ‍ॅटलेटिको माद्रिद संघातील दोन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

स्पॅनिश फुटबॉल क्लब मधील अ‍ॅटलेटिको माद्रिद संघातील दोन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली आहे. काल रविवारी 9 तारखेला क्लबने जाहीर केलेल्या निवेदनात दोन खेळाडूंचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण इतर खेळाडूंना देखील पसरण्याची शक्यता असल्यामुळे अ‍ॅटलेटिको माद्रिद संघात भीतीचे वातावरण आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाची लढत आरबी लाइपझिगशी होणार आहे. त्यापूर्वीच अ‍ॅटलेटिको माद्रिद संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संघातील सर्व सदस्य लिस्बनकडे रवाना होण्यापूर्वी, यूईएफए प्रोटोकॉलनुसार कोरोनाच्या पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतरच दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आल्याचा खुलासा क्लबने केला आहे. मात्र क्लबने अद्याप पर्यंत अधिकृतपणे फुटबॉलपटूंची ओळख जाहीर केलेली नाही.       

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

यूईएफए प्रोटोकॉलनुसार, कोरोनाचा संसर्ग झालेल्या खेळाडूंना इतरांसोबत प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यामुळे यानंतर अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबने दिलेल्या निवेदनात, आरबी लाइपझिग आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील सामन्यापूर्वीच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक, प्रवासाचे आणि निवासाचे नियोजन बदलण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच येत्या बुधवारी पुन्हा संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात येणार असून, यामध्ये निगेटिव्ह अहवाल येणाऱ्या खेळाडूंनाच चॅम्पियन्स लीगच्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे.          


​ ​

संबंधित बातम्या