पराभवानंतरही हार्दिक स्टाईलमध्येच; ट्विटरवर ट्रोल

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

हार्दिकने ट्विटमध्ये म्हटले आहे, की भारतात परतलोय. आम्ही मालिकेत लढलो, पण निकाल निराशाजनक राहिले. अनेक दिवसांनंतर घरी परतलो आहे. आता पुन्हा काही दिवसांसाठी आशिया करंडक खेळण्यासाठी जावे लागणार आहे. हार्दिकच्या या ट्विटवरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दारूण पराभव स्वीकारल्यानंतर मायदेशी परतलेल्या भारतीय खेळाडू हार्दिक पांड्याने ट्विटरवर स्टाईलमध्ये फोटो अपलोड केला. पराभव न विसरलेल्या भारतीय चाहत्यांनी या ट्विटवरून त्याला जोरदार ट्रोल केले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला इंग्लंडकडून 4-1 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली वगळता एकही भारतीय खेळाडूला चमकदार कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेनंतर भारताला इंग्लंडमध्ये मालिका गमवावी लागली आहे. भारतीय संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका होत आहे. आगामी आशिया करंडकापूर्वी हार्दिकने एका फोटोसह केलेल्या ट्विटवरून त्याला लक्ष्य करण्यात येत आहे.

हार्दिकने ट्विटमध्ये म्हटले आहे, की भारतात परतलोय. आम्ही मालिकेत लढलो, पण निकाल निराशाजनक राहिले. अनेक दिवसांनंतर घरी परतलो आहे. आता पुन्हा काही दिवसांसाठी आशिया करंडक खेळण्यासाठी जावे लागणार आहे. हार्दिकच्या या ट्विटवरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या