World Cup 2019 : वेल प्लेड 'टीम इंडिया'!!

वृत्तसंस्था
Wednesday, 10 July 2019

भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. या सामन्यात रविंद्र जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी ठरली. तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही मोक्याच्या वेळी धावबाद झाल्याने सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला.

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे, तर फलंदाजांना बाद करायला मारा केला. मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही

या पराभवानंतर नेटकऱ्यांनी टीम इंडियाला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. ट्विटर, फेसबुकवर 'Team India, Bleed Blue' हे हॅशटॅग सामना संपल्यावर ट्रेण्डिंगला आले. चाहत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वजण पराभव झाल्यानंतरही भारतीय संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरीदेखील एक चांगला सामना तुम्ही खेळला आणि या आठवणी तुम्ही दिल्या, अशा शब्दांत सर्व नेटकऱ्यांनी संघाचे कौतुक केले आहे. विशेषत: अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या लढ्याचे कौतुक सर्वजण करत आहेत. 

जडेजा (77 धावा) धोनी( 50 धावा) यांनी विक्रमी भागीदारी करूनही भारताचा डाव 221 धावात संपवून न्यूझीलंडने 18 धावांचा विजय संपादताना पाठोपाठच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारायची कमाल करून दाखवली. भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. या सामन्यात रविंद्र जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी ठरली. तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही मोक्याच्या वेळी धावबाद झाल्याने सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला.


​ ​

संबंधित बातम्या