INDvsSA : रोहितवर दडपण आणून त्याचा काटा काढण्याचा विराट, शास्त्रींचा डाव

वृत्तसंस्था
Saturday, 28 September 2019

रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पाठवून त्याच्यावर अपेक्षांचे खूप दडपण द्यायचे. या दडपणामुळे तो कसोटीच काय पण आता एकदिवसीय आणि ट्वेंटी20 मधूनही त्याचा काटा दूर करायचा असा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा डाव आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. 

विझीनांग्राम : रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पाठवून त्याच्यावर अपेक्षांचे खूप दडपण द्यायचे. या दडपणामुळे तो कसोटीच काय पण आता एकदिवसीय आणि ट्वेंटी20 मधूनही त्याचा काटा दूर करायचा असा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा डाव आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. 

मी ज्या चूका केल्या, त्या तू करु नकोस; लक्ष्मणचा रोहितला भावनिक सल्ला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या तीन दिवसांच्या सराव कसोटी सामन्यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याला कारणही तसेच आहे. बऱ्याच दिवसांनंतर रोहित शर्मा कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून पुनरागमन करणार होता. मात्र, त्याचे हे पुनरागमन अत्यंत खराब झाले आहे. सराव सामन्यात तो केवळ दोन चेंडूचा सामना करुन भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरवात झाली. मात्र, या सगळ्यात एक प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 

Image may contain: 1 person, text

''रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. तुमच्यावर दडपण आले की हा निकाल लागतो. मला खात्री आहे की आता हे अपयश एकदिवसीय आणि ट्वेंटी20 क्रिकेटमध्येसुद्धा लवकर त्याची पाठ सोडणार नाही. कोहली आमि शास्त्री यांनी त्याची कारकिर्द खराब करण्याचे जणू ठरविलेच आहे.'' रोहितच्या एका चाहत्याने असे ट्विट करत विराट आणि शास्त्रींवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, त्यानंतर त्याने हे ट्विट डिलिट केले.

INDvsSA : रोहित तब्बल दोन चेंडू खेळला अन् शून्यावर माघारी गेला

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित आणि मयांक अगरवाल सलामीला उतरले. सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करण्याचे रोहित खूप दडपण असणार यात काहीच शंका नव्हती आणि झालेही तेच. तो केवळ दोन चेंडू खेळला आणि शून्यावर बाद झाला. फिलेंडरने त्याला बाद केले. 


​ ​

संबंधित बातम्या