INDvsBAN : पंत, संघाला नेहमी लाज आणायचं स्किल येतं कुठून रे?

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की पंतने चेंडू यष्टींच्या पलिकडे पकडला होता. त्याच्या ग्लव्ह्जचा काही भाग यष्टींच्या पुढे होता.  त्यामुळे पंचांनी हा नोबॉल ठरवत लिटनला नाबाद घोषित केले. पुढच्या चेंडूवर फ्रिहिट मिळालेल्या लिटनने चौकार ठोकला.

राजकोट : विश्वकरंडकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला. तेव्हापासून भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, त्याला आजवर कधीच चांगले यष्टीरक्षण करायला जमले नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी चूक केली आणि भारतीय संघाला त्याचा फटका बसला. 

INDvsBAN : शतकी सलामीचा विक्रमी 'चौकार', रोहित-धवननने गाठले 'शिखर'

ऋषभ पंत ने विकेटकीपिंग में किया बड़ा ब्लंडर, सोशल मीडिया पर उड़ा मजाक

सामन्याच्या सहाव्या षटकात युझवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना रिषभ पंतने बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासला यष्टीचित केले. भारतीय संघाने तो बाद झाला म्हणून आनंदी साजरा केला. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टीकला नाही. हे प्रकरण तिसऱ्या पचांकडे गेले. 

ऋषभ पंत ने विकेटकीपिंग में किया बड़ा ब्लंडर, सोशल मीडिया पर उड़ा मजाक

INDvsBAN : कोलकता डे-नाईट कसोटीत नाणेफेकीसाठी वापरणार सोन्याचे नाणे 

रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की पंतने चेंडू यष्टींच्या पलिकडे पकडला होता. त्याच्या ग्लव्ह्जचा काही भाग यष्टींच्या पुढे होता.  त्यामुळे पंचांनी हा नोबॉल ठरवत लिटनला नाबाद घोषित केले. पुढच्या चेंडूवर फ्रिहिट मिळालेल्या लिटनने चौकार ठोकला. त्याची ही चूक पाहून रोहित शर्मा खूपच नाराज दिसत होता तर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या