INDvsSA : पंतची लायकी स्थानिक क्रिकेट खेळण्याचीच

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. मात्र, या सामन्याही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला अपयश आले. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध सतंप्त प्रतिक्रिया येत आहेत.  

मोहाली : शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. मात्र, या सामन्याही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला अपयश आले. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध सतंप्त प्रतिक्रिया येत आहेत.  

INDvsSA : हा क्रेझी विक्रम करणारा कोहली जगातला पहिला फलंदाज

नेहमीप्रमाणे त्याने चुकीच्या शॉटची निवड करत फटका मारला आणि तो केवळ चार धावा करुन बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. 

पंतने वेळोवेळी मिळालेल्या संधीचे सोने केलेले नाही. त्याच्याजागी आता संघात संजू सॅमसन आणि ईशान किशन यांना संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. पंतला स्थानिक क्रिकेटमध्येच पाठवा आणि त्याचे बेसिक्स पक्के झाले त्याच्यात समजूतदारपणा आला कीच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देण्यात यावी असे मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केले आहे.  

रिषभ पंतने विंडीजमध्ये संघाची लाज घालवली : रवी शास्त्री 

 भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला वेस्ट इंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र, जर तो असाच निष्काळजीपणे खेळत राहिला तर त्याला वाईट परिणाम भोगावे लागणार अशा शब्दांत त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेआधी सुनावले होते.

''त्याला आम्ही अजून संधी देणार आहोत हे नक्की मात्र, त्रिनिनादमध्ये ज्या प्रकारे त्याने शॉट मारला तसेच शॉट जर तो परत खेळला तर त्याला नक्कीच खडे बोल सुनावले जातील. कारण असे करुन त्याने स्वत:ची नाही तर संघाची लाज घालवली आहे. जेव्हा तुम्हाला एखादी धावसंख्या गाठायची आहे आणि दुसऱ्या बाजूने तुमचा कर्णधार खेळत असेल तर तुम्हा विचार करुन खेळणे आवश्यक असते,'' अशा शब्दांत शास्त्रींनी पंतला सुनावले होते.  


​ ​

संबंधित बातम्या