INDvsSA : झोपच हो; दक्षिण आफ्रिकेची उडाली, रवी शास्त्रींना लागली

वृत्तसंस्था
Tuesday, 22 October 2019

रांचीतील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी फॉलोऑन देऊन दक्षिण आफ्रिकी फलंदाजांची झोप उडविली होती. त्याचवेळी ड्रेसिंग रुममध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री काही क्षण निद्रादेवीच्या आधीन झाले होते.

रांची : रांचीतील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी फॉलोऑन देऊन दक्षिण आफ्रिकी फलंदाजांची झोप उडविली होती. त्याचवेळी ड्रेसिंग रुममध्ये मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री काही क्षण निद्रादेवीच्या आधीन झाले होते. त्यांनी डुलकी काढल्याचा क्षण थेट प्रक्षेपणादरम्यान दिसला आणि क्षणार्धात व्हायरल झाला. त्यामुळे शास्त्रींची ट्विटरवर खिल्ली उडविली जात होती.

भारताचा दक्षिण आफ्रिकेला 'व्हाइट वॉश'; गोलंदाज चमकले 

या फोटोत तरुण खेळाडू शुभमन गील हा सुद्धा दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहता तो कोड्यात पडल्याचे दिसून येते. एका चाहत्याने झोपा काढण्यासाठी दहा कोटी रुपये, काय मजा आहे, अशी प्रतिक्रिया गीलच्या तोंडी घातली आहे. आणखी एका चाहत्याने म्हटले आहे की, कसोटी सामना सुरु असताना तुम्ही मोबाईलवर गुपचूप बॉम्बे वेल्वेट सिनेमा पाहिला तर असेच घडते असे म्हटले आहे. त्याने स्लीपींग ब्यूटी असा हॅशटॅग दिला आहे.


​ ​

संबंधित बातम्या