World Cup 2019 : गुप्टील, कर्म इथंच फेडायचीत

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्टिल हा धावबाद झाला. उपांत्य फेरीत  धोनीला धावबाद करणाऱ्या गुप्टिलला सोशल मीडियावर भारतीय चाहत्यानी बरेच ट्रोल केले. 

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्टिल हा धावबाद झाला. उपांत्य फेरीत  धोनीला धावबाद करणाऱ्या गुप्टिलला सोशल मीडियावर भारतीय चाहत्यानी बरेच ट्रोल केले. 

पहिल्या उपांत्य सामन्यात गुप्टिलने महेंद्रसिंह धोनीला एका सुरेख थ्रो वर धावबाद केले. तेथेच भारतीय चाहत्यांचा स्वप्नभंग झाला.  याच गोष्टीची आठवण करून देत भारतीय चाहत्यांनी 'जैसी करणी वैसी भरणी' असे म्हणत गुप्टिलला चांगलेच फैलावर घेतले. इंग्लंडविरूद्ध न्यूझीलंडमध्ये काल चुरशीच्या झालेल्या सामन्यानंतर ट्विटरवर गुप्टिलवर प्रचंड टीका करण्यात आल्या. 


​ ​

संबंधित बातम्या