World Cup 2019 : अरेss धर्मसेना मैदानावर झोपला होतास की काय?

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

यंदाच्या विश्वकरंडकात खेळाडूंपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर ती पंचांच्या खराब निर्णयांविषयी. अनेक खेळाडूंना याचा फटका बसला. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांनीही नेमकं तेच केलं. 

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : यंदाच्या विश्वकरंडकात खेळाडूंपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर ती पंचांच्या खराब निर्णयांविषयी. अनेक खेळाडूंना याचा फटका बसला. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांनीही नेमकं तेच केलं. 

जेसन रॉन बाद नसताना त्याला बाद घोषित करण्यात आले आणि त्यामुळेच धर्मसेना यांच्यावर ट्विटरवर जोरदार टीका करण्यात येत आहे. 

जेसन रॉय 85 धावांवर खेळत असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मागे अॅलेक्स केरीने त्याचा झेल पकडला आणि धर्मसेना यांनी त्याला बाद घोषित केले. खरं तर चेंडू ना बॅट लागलेला ना ग्लव्ह्सला, तरीही त्याला बाद घोषित करण्यात आले. दरम्यान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली. 

संबंधित बातम्या