BCCI, राहुल द्रविडसमोर रवी शास्त्रींची लायकी तरी काय?

वृत्तसंस्था
Friday, 20 September 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना बंगळूर येथे होणार असून राहुल द्रविडने भारतीय संघाची भेट घेतली आहे. यावेळेसचा फोटो शेअर करताना बीसीसीआयने When two greats of Indian Cricket meet म्हणजेच भारतीय क्रिकेटचे दोन फलंदाज जेव्हा भेटतात तेव्हा असे कॅप्शन दिले आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेटचे चाहते भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मग त्यांनी काहीही करुदे. बीसीसीआयने भारताचा माजी फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविड आणि शास्त्रींचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आणि मग काय? चाहत्यांनी पुन्हा शास्त्रींना ट्रोल केले. 

दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला आता खेळायचंय इंग्लंडकडून!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना बंगळूर येथे होणार असून राहुल द्रविडने भारतीय संघाची भेट घेतली आहे. यावेळेसचा फोटो शेअर करताना बीसीसीआयने When two greats of Indian Cricket meet म्हणजेच भारतीय क्रिकेटचे दोन फलंदाज जेव्हा भेटतात तेव्हा असे कॅप्शन दिले आहे. 

मात्र, चाहत्यांना काही हे पटलेले नाही. फक्त राहुल द्रविडच महान आहे आमि त्याच्यासमोर शास्त्री काहीच नाही अशी प्रतिक्रीया सर्वत्र उमटू लागली आहे. 
 
​ ​

संबंधित बातम्या