कॅरेबियन लीगमधील विक्रम; एका डावात सर्व गडी झाले होते झेलबाद (व्हिडिओ)

सुशांत जाधव
Sunday, 9 August 2020

कॅरेबियन लीगच्या अधिकृत अकांउटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

विंडीजमध्ये रंगणारी कॅरेबियन लीग अवघ्या काही दिवासांवर येऊन पोहचली आहे. कोरोनातून सावरत क्रिकेटच्या जगतात रंगणारी ही पहिली स्पर्धा असेल. 18 ऑगस्टपासून यंदाच्या हंगमाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत झालेल्या 7 हंगामापैकी दुसऱ्या हंगामात बारबाडोस ट्राइडेंट्सने अनोख्या विक्रमाची नोंद केल्याचे पाहायला मिळाले होते. 2014 मध्ये रंगलेल्या कॅरेबियन लीगमध्ये बारबाडोस ट्राइडेंट्सने प्रतिस्पर्धी त्रिनिदाद ट्रेबगो रेड स्टिल सध्याचा ट्रिनबगो नाइट रायडर्स संघातील सर्वच्या सर्व दहा गड्यांना झेलबाद केले होते. 

CPL2020 : गोलंदाजीतील कमालीचा विक्रम नाइट रायडर्सच्या नावे, पाहा व्हिडिओ

कॅरेबियन लीगच्या अधिकृत अकांउटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या सामन्यात बारबाडोस ट्राइडेंट्सने कमालीचे क्षेत्ररक्षण म्हणजे काय याचा एक नमुनाचा दाखवून दिला होता. प्रत्येक झेल डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. या सामन्यात बारबाडोस ट्राइडेंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 174 धावा केल्या होत्या.  या धावांचा पाठलाग करताना त्रिनिदाद ट्रेबगो रेड स्टिलचा संघ 105 धावांत आटोपला होता.  निकोलस पूरन (33), एव्हिन लुईस (14), ड्वेन ब्रावो (16)  आणि डरेन ब्रोवो (12) या फलंदाजांशिवाय एकालाही दुहेरी आकडा पार करता आला नव्हता.  यात सर्व गडी झेलबाद झाले होते. बारबाडोस ट्राइडेंट्सचे चार जण झेलबाद झाले. तर एक गडी धावाबाद झाला होता. 


​ ​

संबंधित बातम्या