'वर्ल्ड कप'पर्यंत कोहलीसह सर्वांनाच एकदा तरी 'बसवणार'..!

वृत्तसंस्था
Monday, 8 October 2018

संघातील प्रमुख खेळाडूंवरील सामन्याचा ताण कमी व्हावा यासाठी संघ व्यवस्थापन आता ठोस पावले उचलणार आहे. कर्णधार विराट कोहलीसह संघातील आणखी काही प्रमुख खेळाडूंना पुढील काही महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेंटी20 मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. 

आता सर्वच प्रमुख खेळाडूंना देणार विश्रांती

नवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेला अवघे काही महिने राहिले असताना संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना विश्रांती देण्याचे चांगलेच मनावर घेतले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये सर्व प्रमुख खेळाडूंना आळीपाळीने विश्रांती देण्यात येणार आहे. 

संघातील प्रमुख खेळाडूंवरील सामन्याचा ताण कमी व्हावा यासाठी संघ व्यवस्थापन आता ठोस पावले उचलणार आहे. कर्णधार विराट कोहलीसह संघातील आणखी काही प्रमुख खेळाडूंना पुढील काही महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेंटी20 मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. 

कोहलीला नुकत्याच झालेल्या आशिया करंडकातही विश्रांती देण्यात आली होती तर त्यापूर्वी यंदा अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही त्याला विश्रांती देण्यात आली होती. तसेच सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडीडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारताचे प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमरा यांना विश्रांती देण्यात आली आहे.

विश्वकरंडकापर्यंत भारत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा करणार आहे तर पुन्हा मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतर लगेच आयपीएलही सुरु होणार आहे. त्यामुळेच सगळ्या प्रमुख खेळाडूंना येत्या काळात विश्रांती देण्यात येणार आहे. मात्र, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमरा यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

''विश्वकरंडकासाठी तंदुरुस्तीचा प्रश्न असेल तर विराट कोहलीला पुन्हा विश्रांती देण्यात येऊ शकते. विश्वकरंडकासाठी संघाची बांधणी करण्यासाठी आळीपाळीने सगळ्यांना विश्रांती देण्याचा विचार सुरु आहे,'' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. 


​ ​

संबंधित बातम्या