'ATP चा नवा कार्यक्रम नदाल-जोकोविचला संभ्रमात टाकाणारा' 

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वर्षातील ग्रँडस्लॅम स्पर्धेच वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत पुन्हा खेळ सुरु करण्यासाठी एटीपीने जारी केलेला नवा कार्यक्रम हा जोकोविच आणि नदाल सारख्या स्टार खेळाडूंना अनुकूल नाही, असे टोनी नदाल यांनी म्हटले आहे. 

मॅड्रिड : टेनिस जगतातील आघाडीचा टेनिसपटू आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानवर असलेल्या राफेल नदालचे माजी प्रशिक्षक आणि चुलते टोनी नदाल यांनी एटीपीच्या नव्या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एटीपीच्या कोणत्या स्पर्धेत खेळावे आणि कोणत्या स्पर्धेत खेळू नये, असा प्रश्न स्पॅनिश खेळाडूसमोर उभा राहिला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर टेनिस पुन्हा पूर्वपदावर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण नदालने अद्याप कोणत्या स्पर्धेतून खेळण्यास सुरुवात करावी हे ठरवलेले नाही. एटीपीने जाहीर केलेल्या नव्या कार्यक्रमामुळे त्याच्यासमोर संभ्रम निर्माण झालाय, असे टोनी नदाल यांनी म्हटले आहे. राफाशी संवाद साधल्यानंतर तो संभ्रमात असल्याचे कळले, असा दाखलाही टोनी नदाल यांनी दिलाय. 

शोएबनं सानियाच्या डोळ्यादेखत केल माहिराशी फ्लर्ट; मग काय चर्चा तर होणारच

नदाल फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनचा विद्यमान विजेता आहे. या दोन्ही स्पर्धा चार आठवड्यांच्या आत घेण्याचा नवा कार्यक्रम एटीपीने जाहीर केलाय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वर्षातील ग्रँडस्लॅम स्पर्धेच वेळापत्रक कोलमडले आहे. 17 जूनपासून टेनिस कोर्टवरील खेळ सुरु होईल असे एटीपीने स्पष्ट केले आहे. एटीपीने जाहीर केलेल्या नव्या कार्यक्रमावर टोनी नदाल यांनी नाराजी व्यक्त केलीय. नवा कार्यक्रम हा राफेल नदालसाठीच नव्हे तर टेनिस जगतातील अव्वलस्थानी असलेल्या नोवाक जोकोविचच्या विरोधातील आहे, असे मत त्यांनी व्यक्त केलेय. टोनी म्हणाले की, जे वरिष्ठ खेळाडू सातत्याने खेळत असतात त्यांच्यासाठी नवा कार्यक्रम अनुकूल वाटत नाही. राफेल नदाल आणि जोकोविच यांचे टेनिसमध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे नव्या कार्यक्रम जाहीर करताना त्यांचा विचार व्हायला हवा होता.  

जिममध्ये जायचय? अगोदर हे वाचा 

मे-जूनमध्ये आयोजित करण्यात येणारी वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली फ्रेंच ओपन स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. 24 मे ते 7 जून दरम्यान नियोजित असणारी ही स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. याशिवाय वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम असलेली अमेरिकन ओपन ही स्पर्धा 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही स्पर्धेत अंतर नसल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंसमोर कोणत्या स्पर्धेत सहभागी घ्यावा असा प्रश्न पडला आहे.  


​ ​

संबंधित बातम्या