टोकियो ऑलिंपिक स्पर्धा लांबणार किंवा रद्दही होणार नाही 

संजय घारपुरे
Thursday, 30 July 2020

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा नव्या कार्यक्रमानुसार 23 जुलै 2021 पासून घेण्याचे ठरले आहे. ही स्पर्धा आता पुन्हा लांबणीवर पडणार नाही किंवा रद्दही होणार नाही, असे टोकियो संयोजन समितीने स्पष्ट केले. 

टोकियो : टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा नव्या कार्यक्रमानुसार 23 जुलै 2021 पासून घेण्याचे ठरले आहे. ही स्पर्धा आता पुन्हा लांबणीवर पडणार नाही किंवा रद्दही होणार नाही, असे टोकियो संयोजन समितीने स्पष्ट केले. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

कोरोना महामारीमुळे 2020 ची स्पर्धा लांबणीवर टाकणे भाग पडले आहे. मात्र आता पुन्हा स्पर्धा लांबणीवर टाकण्याबाबत अथवा रद्द करण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही ठरलेल्या नव्या कार्यक्रमानुसार स्पर्धा घेण्यास कटिबद्ध आहोत, असे संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योशिरो मुतो यांनी सांगितले. 

बिहार, आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी विराट व अनुष्काचा पुढाकार    

प्रत्येकाने स्पर्धा पुढील वर्षी होतील याकडेच लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. प्रेक्षकांविना ऑलिंपिक ही संकल्पना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांना मान्य नाही. त्यामुळे या स्पर्धेच्यावेळी मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा विचार होत आहे. ज्याद्वारे प्रेक्षकांत सुरक्षित अंतर राखता येईल, असेही मुतो यांनी नमूद केले. ऑलिंपिक सुरक्षित आहे हे वातावरण निर्माण करावे लागेल. क्रीडापटू, मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफ, तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सदस्यांची जपान येण्यापूर्वी चाचणी आवश्‍यक आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या निवासस्थानी, तसेच प्रवास पूर्णपणे सुरक्षित असणेही आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले. जपानमध्ये सध्या शंभरहून अधिक देशांच्या प्रवेशावर बंदी आहे. स्पर्धा सुरू होईपर्यंत सर्व निर्बंध दूर झाले असतील हा विचार करण्याऐवजी पर्यायांचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनावरील लस मिळाली तर त्याचा फायदाच होईल, पण स्पर्धा घेण्यासाठी ही अट असू शकत नाही. कोणत्या वातावरणात स्पर्धा होईल, याचा अंदाज या वर्षाअखेरपर्यंत येऊ शकेल. 
- योशिरो मुतो, संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी. 

टोकियोत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ऑलिंपिकचे यशस्वी संयोजन करायचे असेल तर कोरोनाची टोकियोत असलेली साथ जपानभर पसरणार नाही, याची खबरदारी अत्यावश्‍यक आहे. 
- युरोको कोईके, टोकियोचे राज्यपाल.


​ ​

संबंधित बातम्या