टोक्यो ऑलिम्पिक २०२० अखेर लांबणीवर!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

खेळाडू आणि देशाच्या इतर नागरिकांच्या आरोग्याची विचार करत कॅनेडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या देशातील क्रिडा समित्यांनी त्यांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिक 2020 साठी न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

जगभरात कोरोना व्हायरस पसरत आहे, सगळे देश कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सगळे देश मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. या व्हायरसमुळे सगळ्या क्रिडा स्पर्धा रद्द केल्या गेल्या आहेत. 24 जूलै 2020 पासून टोक्यो शहरात होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकल्याण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे. ही स्पर्धा 2020 ऐवजी 2021 मध्ये घेण्यात येणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकसाठी कॅनडा पाठवणार नाही खेळाडू!

कॅनेडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या देशांनी त्यांचे खेळाडू स्पर्धेत पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला. जगभारातील परिस्थीती पहाता ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलणेच योग्य आहे असे मत जपानच्या शिंजो आबे यांनी व्यक्त केलं आहे.

भारतीय हॉकी संघांची सुरक्षित वातावरणात सरावाला सुरुवात

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सगळ्या देशांनी प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. देश लॉकडाऊन स्थितीत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत शहभागी होण्यासाठी खेळाडू सराव करु शकणार नाहीत तसेच सरावादरम्यान सगळ्याचेच आरोग्य धोक्यात येऊ शकते. खेळाडू आणि देशाच्या इतर नागरिकांच्या आरोग्याची विचार करत कॅनेडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या देशातील क्रिडा समित्यांनी त्यांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिक 2020 साठी न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. सर्व देशांकडून दबाव टाकला गेल्याने स्पर्धा वर्षभराने पुढे ढकल्याण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे


​ ​

संबंधित बातम्या