सचिनला बाद केल्यावर या गोलंदाजाला देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी!

टीम ई-सकाळ
Monday, 8 June 2020

सचिन नव्वदीच्या घरात खेळत असताना त्याच्या ह्रदयाच्या ठोक्यापेक्षाही अधिक गतीने कदाचित त्याच्या चाहत्यांचे ह्रदयाची धकधक वाढायची. अनेकदा तो नव्वदीच्या घरात बादही झाला. काहीवेळा पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा तो शिकार ठरला तर काहीवेळा गोलंदाजाच्या क्षमतेसमोर त्याला नमते घ्यावे लागले.

मुंबई : शतकांचा बादशहा सचिन रमेश तेंडुलकर मैदानात खेळत असताना तो बाद होऊ नये, असे त्याच्या चाहत्यालाच नव्हे तर क्रिकेटची जाण असलेल्या प्रत्येकाला वाटायचे. त्याच्या भात्यातून पाहायला मिळणाऱ्या फटकेबाजीत मन मोहित करण्याची जादू असायची. अनेकदा तेंडुलकर वादग्रस्तरित्या बाद झाल्याने पंच ट्रोल झाल्याचेही पाहायला मिळाले. (त्यावेळी ट्रोलचा ट्रेंड नव्हता) सचिन नव्वदीच्या घरात खेळत असताना त्याच्या ह्रदयाच्या ठोक्यापेक्षाही अधिक गतीने कदाचित त्याच्या चाहत्यांचे ह्रदयाची धकधक वाढायची. अनेकदा तो नव्वदीच्या घरात बादही झाला. काहीवेळा पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा तो शिकार ठरला तर काहीवेळा गोलंदाजाच्या क्षमतेसमोर त्याला नमते घ्यावे लागले. सचिनची विकेट मिळणं ही त्याकाळात प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असायचे. ते साकार झाले की त्यांचा आनंद गगनात मावायचा नाही. 

#वर्णभेदाचा _खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

इंग्लंडचा तत्कालीन गोलंदाज टिम ब्रेसनेन याने नुकतेच सचिन संदर्भातील एक आठवण सांगितली आहे. 2011 मध्ये सचिन तेंडुलकर शंभराव्या शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याने 91 धावांवर सचिनला बाद केले होते. त्यावेळी मला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा खुलासा टिम ब्रेसनेन याने केलाय. यावेळी पंचाना देखील धमकी देण्यात आल्याचेही त्याने म्हटले आहे.  2011 मध्ये ओव्हल कसोटीत सचिन तेंडुलकरला  टिम ब्रेसनेन याने 91 धावांवर बाद केले होते. त्यामुळे सचिनच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाला हुलकावणी मिळाली होती. सचिनसह चाहत्यांना सचिन बाद होणे रुचले नव्हते. नाराजीचा सूर इतका होता की सचिनला बाद करणाऱ्या टिम ब्रेसनेनसह त्याला बाद ठरवणारे पंच रॉड टकर यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

पाकच्या या क्रिकेटरला टिम इंडियाच्या ताफ्यासोबत फिरायचंय

यॉर्कशायर क्रिकेटशी संवाद साधताना  टिम ब्रेसनेन याने या गोष्टीचा खुलासा केलाय. तो म्हणाला की, ' सामन्यातील पंचासह मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ट्विटरवर रॉड टकर यांच्या घरचा पत्ता शेअर करण्यात येत होता. सचिन तेंडुलकरला बाद घोषीत करण्याची तुमची हिंमत कशी झाली, अशा प्रतिक्रिया देखील त्यावेळी ट्विटरवर उमटल्या होत्या. या सामन्यात सचिनला पायचित बाद ठरवण्यात आले होते. चेंडू लेग स्टंपला मिस करत असल्यामुळे पंचांनी चुकीचा निर्णय दिला, अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेनंतर मला पोलिस संरक्षण घ्यावे लागले, असेही टिम ब्रेसनेन याने सांगितले. 2011 मध्ये सचिनसाठी अखेरचा इंग्लंड दौरा होता. शंभरावे आंतरराष्ट्रीय शतकाला हुलकावणी मिळाल्यानंतर  'द गार्जियन'ने सचिनला शंभरावे शतक करु दिले नाही, अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.  

10 years ago today #T20WorldCup winners in Bridgetown Barbados!! pic.twitter.com/2LvilIql7p

— Tim Bresnan (@timbresnan) May 16, 2020


​ ​

संबंधित बातम्या