'जंटलमन्स गेम'वर मॅच फिक्सिंगचे सावट, या संघातील त्रिकूट अडचणीत

टीम ई-सकाळ
Thursday, 4 June 2020

मॅच फिक्सिंगची प्रकरणे होऊ नयेत यासाठी अनेक नियम आणि अटीसह काही विशेष समित्यांची स्थापना देखील करण्यात आली. या प्रकारच्या घटनांवर संघटना बारिक लक्ष ठेवून असतात. तरीही...

कोलंबो : नव्वदीच्या दशकात मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने क्रिकेट एकच खळबल माजली होती. मॅच फिक्सिंगच्या त्या वादळाचा फटका भारतीय संघाला बसला होता. त्यानंतर अशा प्रकारची वेगवेगळी प्रकरणे समोर आल्याने 'जंटलमन्स गेम' बदनाम झाल्याचेही चित्र आपण पाहिले. मॅच फिक्सिंगची प्रकरणे होऊ नयेत यासाठी अनेक नियम आणि अटीसह काही विशेष समित्यांची स्थापना देखील करण्यात आली. या प्रकारच्या घटनांवर संघटना बारिक लक्ष ठेवून असतात. तरीही ही फिक्सिंगचा प्रकार सुरु असल्याचेच संकेत या प्रकरणामुळे मिळतात. श्रीलंकेचे माजी क्रिकेटर मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकणार की त्यांची सुटका होणार हे चौकशीनंतरच समोर येईल. क्रिकेटर्सची नावेही अद्याप समोर आलेली नाहीत.  

बाळामुळं हा खेळाडू टाळेबंदीनंतरच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

श्रीलंकेतील तीन क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच फिक्सिंग प्रकरणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दुल्लास अलाहापेरुमा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. ज्या खेळाडूंची चौकशी झाली आहे त्यात विद्यमान संघाशी सलग्नित एकही खेळाडू नाही, अशी माहिती देखील त्यांनी दिली. श्रीलंकन माजी क्रिकेटर्सवरील आरोपामुळे क्रिकेटमधील सामना निश्चितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वर्णभेदाच्या मुद्यावर केअएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट
 

तत्पूर्वी पाकिस्तानचा उमर अकमल मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. त्याला तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली.  मात्र या घटनेनंतर आंतराष्ट्रीय स्तरावर मॅच फिक्सिंगने पुन्हा पाय वर काढल्याचे दिसत आहे. दरम्यान यापूर्वी पाकिस्तानचा खेळाडू उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मॅच फिक्सिंग प्रकरणी बुकी संजीव चावलाला काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळेस संजीव चावलाने कोणताही सामना हा प्रामाणिकपणे खेळला जात नसल्याचे सांगत, सर्वच सामने फिक्स असल्याचे सांगितले होते. एखाद्या चित्रपटाप्रमाणे लोक पाहत असलेले सर्वच सामने हे पूर्वीच निश्चित असल्याचे धक्कादायक विधान संजीव चावलाने केले होते. 2000 सालच्या भारत दौऱ्यावरील दक्षिण आफिकेच्या सामन्यात मॅच फिक्सिंग प्रकरणी बुकी  संजीव चावलाला दोषी ठरवण्यात आले होते.


​ ​

संबंधित बातम्या