EngvsPak : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात उद्या रंगणार तिसरा व अंतिम कसोटी सामना 

टीम ई-सकाळ
Thursday, 20 August 2020

साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे.

वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपासून तब्बल चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली होती. या मालिकेत इंग्लंडने विंडीज संघाला नमवल्यानंतर 5 ऑगस्टपासून इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरवात झाली. या मालिकेतील मँचेस्टर येथील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला हार पत्करावी लागली होती. तर साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथील दुसऱ्या सामन्यात पावसाच्या आगमनामुळे सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे. त्यानंतर उद्या गुरवार 21 ऑगस्ट पासून, साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे.

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर       

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑगस्ट रोजी मँचेस्टर येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत पहिला सामना जिंकला होता. पाकिस्तानला या कसोटीत मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात, मालिकेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने इंग्लंडचा संघ मैदानावर उतरेल. तर पाकिस्तानचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने या सामन्यात विजय मिळवण्याच्याच हेतूने मैदानावर येईल. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड       

दरम्यान,  इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे 45.4 षटकांचाच झाला. तर दुसऱ्या दिवशी देखील पावसाने पुन्हा व्यत्यय आणल्यामुळे 40.2 षटके खेळली गेली. त्यानंतर सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने पाकिस्तानला 236 धावांवर रोखले. पाकिस्तानच्या 236 धावांची बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला शाहीन आफ्रिदीने सुरवातीलाच सलामीवीर रोरी बर्न्सला शून्य धावांवर बाद केले. त्यानंतर डॉम सीब्ले 32 आणि क्रॉलीने 53 इंग्लंडला पडझडीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघे देखील बाद झाल्यानंतर आलेला ओली पॉप 9 धावांवर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 110 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे पुन्हा खेळ थांबवावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित ठरल्यामुळे या मालिकेत पराभवापासून वाचण्यासाठी पाकिस्तानला शेवटचा आणि तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या