ENGVsWI : इंग्लंड-विंडीज यांच्यात उद्या रंगणार तिसरा व निर्णायक कसोटी सामना  

ऋतुराज मोगली
Thursday, 23 July 2020

उद्या शुक्रवार 24 जुलै पासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना होणार आहे.         

कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने तर मँचेस्टर येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. त्यानंतर उद्या शुक्रवार 24 जुलै पासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना होणार आहे.         

बीसीसीआयच्या आर्थिक पाठबळामुळेच हरभजन सिंगची 'त्या' प्रकरणातून सुटका 

कोरोनाच्या काळानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येऊ लागले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात 8 जुलै रोजी पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1 - 0 ने आघाडी मिळवली होती. मात्र मँचेस्टर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने जोरदार पुनरागमन करत, वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता. या विजयसोबतच तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली. यानंतर आता उद्या पासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात तिसरा व शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून, दोन्हीही संघ मालिका काबीज करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे सर्वच क्रिकेट चाहत्यांची नजर या तिसऱ्या कसोटी सामन्याकडे असणार आहे.        
    
दरम्यान, मँचेस्टर येथील इंग्लंड-विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर डॉम सिब्ले (120) आणि बेन स्टोक्स (176) यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 9 गड्यांच्या बदल्यात 469 धावांवर मजल मारली आणि डाव घोषित केला होता. यानंतर फलंदाजी साठी आलेल्या पाहुण्या विंडीजच्या संघाला 287 धावांवर रोखत इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. व दुसऱ्या डावात 129 धावा करत इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाला 312 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करता न आल्यामुळे इंग्लंड-विंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला होता. 

जागतिक विजेत्या सिंधूचा घरातच 'सराव' 

त्यामुळे उद्या होणारा तिसरा कसोटी सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकल्यास विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये 32 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकेल. यापूर्वी 1988 मध्ये विंडीज संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4 - 0 ने हरवले होते. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ 157 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांपैकी 49 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर 57 सामन्यांत इंग्लंड पराभव पत्करावा लागला आहे. त्याचवेळी इंग्लंड संघाने घरातील विंडीजविरुद्धच्या झालेल्या 87 सामन्यांपैकी 34 सामने जिंकले आहेत. तर 31 सामने इंग्लंड संघाने गमावले आहेत. आणि 22 सामने अनिर्णित राहिले आहेत.

 


​ ​

संबंधित बातम्या