Asia Cup 2018 : ब्रेट ली म्हणतो, या दोघांवर असेल भारताची मदार

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया करंडकात खेळणाऱ्या भारतीय संघाची मदार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या खांद्यावर असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया करंडकात खेळणाऱ्या भारतीय संघाची मदार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या खांद्यावर असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला 15 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, रोहित शर्माकडे कर्णधारपद आणि शिखर धवनकडे उपकर्णधारपद दिले आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची कामगिरी कशी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 19 सप्टेंबरला सामना होणार आहे.

ब्रेट ली म्हणाला, की विराट नसल्याने भारतीय संघासाठी रोहित आणि धवन हे दोघेच महत्त्वपूर्ण असणार आहेत. रोहितला स्वतःसाठी आणि संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तसेच त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याचीही जबाबदारी असणार आहे. यूएईमध्ये त्याला स्विंग गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. त्याला डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अडचणीत आणू शकतात. पण, मला विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करू शकतो. धवननेही आपल्या शैलीत बदल करून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे.


​ ​

संबंधित बातम्या