ओव्हलवरच घेतली 'या' दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. दिग्गजांच्या निवृत्तीच्या बाबतीत ओव्हलचे मैदान नेहमीच खास ठरले आहे. कारण या मैदनावर क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले शेवटचे सामने खेळले आहेत. या यादीत आता अॅलिस्टर कुकची भर पडली आहे. 

ओव्हलच्या मैदानावर यापूर्वी या दिग्गजांनी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला    होता : 

1. डॉन ब्रॅडमन : ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी 1948मध्येइंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेत आपला अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात मात्र ते पहिल्यांदा शून्यावर बाद झाले होते आणि त्यामुळेच त्यांची सरासरी 99.94 झाली होती. ब्रॅडमन यांनी 52 सामन्यांमध्ये 6996 धावा केल्या आहेत. 

2. व्हिव्हियन रिचर्डस, माल्कम मार्शल, जेफ ड्युजोन : वेस्ट इंडिजचा संघा माजी कर्णधार व्हिव्हियन रिचडर्स यांच्या नेतृत्वाखाली 1991 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी आला होता. ओव्हलवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली होती. व्हिव्हियन रिचर्डस, माल्कम मार्शल आणि जेफ ड्युजोन या तिघांचाही हा अखेरचा सामना होता. व्हिव्हियन रिचर्डस यांनी 121 सामन्यांमध्ये 8540 धावा केल्या आहेत. तसेच जेफ डुजोन यांनी 81 सामन्यांमध्ये 3322 धावा केल्या आहेत तर, माल्कम मार्शल यांनी 81 सामन्यांमध्ये 376 बळी घेतले आहेत. 

3. कर्टली एम्ब्रोस : वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांनीसुद्धा 2000 मध्ये आपला अखेरचा सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला होता. त्यांनी 98 सामन्यांमध्ये 405 बळी घेतले आहेत. 

4. माईक आथर्टन आणि अॅलेक स्टुअर्ट : इंग्लंडचा माजी फलंदाज माईक आथर्टन यांनीही 2001 मध्ये ओव्हलवरच आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यांनी 115 सामने खेळताना 7728 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेक स्टुअर्ट यांनीही 2003 मध्ये याच मैदानावर अखेरचा सामना खेळला होता. त्यांनी 133 सामन्यांमध्ये 8463 धावा केल्या होत्या. 

5. अॅण्ड्रयू फ्लिंटॉफ : इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू अॅण्ड्रयू फ्लिंटॉफ यांनीही 2009 मध्ये ओव्हलवरच आपला अखेरचा सामना खेळला होता. त्यांनी 79 सामन्यांमध्ये 3845 धावा केल्या असून तसेच 226 बळी घेतले आहेत. 

6. मायकल क्लार्क : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यानेही 2015 मध्ये याच मैदानावर आपला अखेरचा सामना खेळला होता. त्याने 115 सामन्यांमध्ये 8643 धावा केल्या आहेत. 

​ ​

संबंधित बातम्या