'हे' क्रिकेटपटू कसोटीत कधीच शून्यावर बाद झाले नाहीत...

टीम ई-सकाळ
Thursday, 16 July 2020

कसोटीमध्ये फलंदाजी करताना विकेट वर टिकून राहणे कठीण आहे. त्यामुळेच कसोटी इतिहासात अनेक खेळाडूंनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. परंतु क्रिकेटच्या कसोटीत असेही क्रिकेटपटू आहेत, जे आपल्या कारकीर्दीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत.      

क्रिकेट या खेळाची सुरवात मुळातच कसोटीच्या प्रकारातून सुरु झाली. त्यानंतर बदलत्या परिस्थितीनुसार पाच दिवसांच्या कसोटीनंतर 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांना सुरवात झाली. तर आता अतिजलद अशा टी20 सामन्यांना अधिक लोकप्रियता मिळू लागलेली आहे. मात्र क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तीनही प्रकारांमध्ये कसोटी प्रकारात टिकणे सर्वात कठीण मानले जाते. पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्यात खेळाडूची तंदरुस्ती ही सर्वात महत्वाची ठरते. त्यामुळेच क्रिकेट प्रकारातील कसोटी सामन्यात क्रिकेटपटूंची खेळताना खरी कसोटी ठरते. कसोटी प्रकारात खेळाडूला टिकणे जेवढे कठीण आहे, तेवढेच कसोटीमध्ये फलंदाजी करताना विकेट वर टिकून राहणे कठीण आहे. त्यामुळेच कसोटी इतिहासात अनेक खेळाडूंनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. परंतु क्रिकेटच्या कसोटीत असेही क्रिकेटपटू आहेत, जे आपल्या कारकीर्दीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत.      

महेंद्र सिंग धोनी हा शांत व संयमी खेळाडू - मायकल हसी     

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जेम्स वॉलेस ब्रूक हे त्यांपैकीच एक फलंदाज आहेत जे आपल्या कसोटी कारकीर्दीत कधीच शून्यावर बाद झाले नाहीत. जेम्स वॉलेस ब्रूक यांनी 1951 ते 59 दरम्यान 24 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या एकूण 44 डावात त्यांनी 34.59 च्या सरासरीने 1280 धावा केल्या आहेत. जेम्स वॉलेस ब्रूक यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचेच माजी फलंदाज रेगी डफ दुसऱ्या क्रमांकावर असून, रेगी डफ हेही कसोटी सामन्यांमध्ये कधीच शून्यावर आउट झाले नाहीत. रेगी डफ यांनी 1902 ते 05 या तीन वर्षाच्या दरम्यान 22 कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला. यातील 40 डावांमध्ये रेगी डफ हे शून्यावर कधीच बाद झाले नाहीत.

 जेम्स वॉलेस ब्रूक आणि रेगी डफ यांच्यानंतर भारताचे माजी फलंदाज ब्रजेश पटेल हे या यादीमध्ये तिसऱ्या नंबरवर असून, पटेल यांनी 21 कसोटी सामन्यांच्या 38 डावांमध्ये 29.45 च्या सरासरीने 972 धावा केल्या आहेत. मात्र या आपल्या छोट्याशा कारकिर्दीत ब्रजेश पटेल हे देखील शून्यावर कधीच बाद झाले नाहीत. ब्रजेश पटेल हे सध्या इंडियन प्रीमियर लीगचे (आईपीएल) चेअरमन आहेत.   

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना 

तर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड वेस्टइंडीज संघातील कर्टने वॉल्श या खेळाडूच्या नावावर आहे. कसोटीमध्ये 500 पेक्षा अधिक विकेट कर्टने वॉल्श या गोलंदाजाने घेतले आहेत. मात्र सर्वात शेवटी फलंदाजीसाठी येणारा कर्टने वॉल्श 185 कसोटीत 43 वेळा शून्यावर आउट झाला आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंड संघाचा क्रिस मार्टिन 36 वेळा व ऑस्ट्रेलियाचा ग्लैन मॅकग्रा 35 वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे.      

 


​ ​

संबंधित बातम्या