बीसीसीआयच्या भोंगळ कारभारामुळे 'हे' स्टार क्रिकेटर्स आले अडचणीत

टीम ई-सकाळ
Saturday, 13 June 2020

भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह स्मृति मानधना व दीप्ति शर्मा या खेळाडूंना राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) नोटीस पाठविली आहे. या खेळाडूंनी आपल्या ठाव ठिकाण्याबाबत कोणतीच माहिती दिली नसल्यामुळे नाडाने ही कारवाई करत नोटीस बजावली आहे. 

भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह स्मृति मानधना व दीप्ति शर्मा या खेळाडूंना राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) नोटीस पाठविली आहे. या खेळाडूंनी आपल्या ठाव ठिकाण्याबाबत कोणतीच माहिती दिली नसल्यामुळे नाडाने ही कारवाई करत नोटीस बजावली आहे. 

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'

नाडाचे संचालक नवीन अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती देताना, राष्ट्रीय नोंदणीकृत टेस्टिंग पूलमधील (एनआरटीपी) ११० खेळाडूंपैकी चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, लोकेश राहुल, स्मृति मानधना आणि दीप्ति शर्मा या खेळाडूंचा ठाव ठिकाण्या संदर्भातची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) दिली नाही. आणि त्यामुळेच या खेळाडूंना नोटीस बजवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अँटी डोपिंग ऍडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सिस्टम (एडीएएमएस) या सॉफ्टवेअर मध्ये खेळाडूला ठाव ठिकाण नमूद करण्याचे दोन मार्ग असल्याचे नवीन अग्रवाल यांनी सांगितले. पहिला मार्ग म्हणजे खेळाडू स्वतः किंवा दुसरा मार्ग त्या खेळाडूची संबंधित संघटना ही माहिती नमूद करत असते. अनेकवेळा खेळाडूंचे शिक्षण पुरेसे नसल्यामुळे खेळाडूची संबंधित संघटना हीच सर्व माहिती नाडाला कळवत असल्याचे नवीन अग्रवाल यांनी सांगितले. मात्र क्रिकेट क्षेत्रातील खेळाडू मात्र पुरेसे शिक्षित असतात, तरीदेखील कोणत्यातरी अडचणीमुळे त्यांची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी बीसीसीआयने स्वत: वर घेतली असल्याचे नवीन अग्रवाल यांनी अधोरेखित केले. मात्र यावेळेस तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी, ही माहिती का दिली नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

धोनीसारखं मला कधीच जमलं नाही : राहुल द्रविड

तसेच, याबाबत पहीला बीसीसीआयकडून एडीएएमएस या सॉफ्टवेअरच्या पासवर्ड मध्ये गडबड झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले व नंतर ही अडचण दूर झाली असल्याचे बीसीसीआयने कळवले असल्याची माहिती  नवीन अग्रवाल यांनी दिली. तसेच बीसीसीआयच्या या चुकीवर येणारे स्पष्टीकरण ग्राह्य करण्याबाबत बरोबर असल्यास मंजूर करण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले. याव्यतिरिक्त देशात लॉकडाऊन सुरू आहे आणि तीन महिन्यांचा पत्ता सादर करण्याचा नियम अनिवार्य असून, अशा चुकांमुळे अँटी डोपिंग नियमाच्या उल्लंघनानुसार (एडीआरव्ही) दोन वर्षापर्यंतचे निलंबन होण्याची शक्यता असल्याची माहिती नाडाचे संचालक नवीन अग्रवाल यांनी दिली आहे.       

 


​ ​

संबंधित बातम्या