जॉर्जच्या मृत्यूनंतर वर्णभेदाच्या मुद्यावरुन गेलनं केला गौफ्यस्फोट!

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 June 2020

खेळ स्पर्धाही दोन वेगवेगळ्या गटातील केवळ वर्चस्वाचा मुद्दा नसतो. तर एकमेकांना जाणून घेण्याचे ते एक व्यासपीठत असते. पण खेळाच्या मैदानात आपण अनेकदा दुर्देवी घटनाचे साक्षीदार होतो. वर्णभेद हा त्यातीलच एक मुद्दा.

मुंबई : खेळ स्पर्धाही दोन वेगवेगळ्या गटातील केवळ वर्चस्वाचा मुद्दा नसतो. तर एकमेकांना जाणून घेण्याचे ते एक व्यासपीठत असते. पण खेळाच्या मैदानात आपण अनेकदा दुर्देवी घटनाचे साक्षीदार होतो. वर्णभेद हा त्यातीलच एक मुद्दा. अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यात असताना जॉर्ज फ्लॉयड याचा झालेल्या मृत्यूमुळे वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने वर्णभेदाच्या मुद्यावर भाष्य केले आहे. केवळ फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही वर्णभेद केला जातो, असा आरोप गेलने केलाय.

खेलरत्न पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

गेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, कृष्णवर्णीय लोकांचे जीवन हे देखील इतरांप्रमाणेच महत्त्वपूर्ण आहे. मी जग फिरलोय. मी वर्णभेदासंदर्भात खूप गोष्टी अनुभवल्या आहेत. मी स्वत: कृष्णवर्णीय असल्यामुळे मला याचा सामनाही करावा लागला. वर्णभेदाचा मुद्दा हा केवळ फुटबॉल पुरता मर्यादित नाही. क्रिकेटमध्येही हा प्रकार पाहायला मिळतो. कृष्णवर्णीय असल्यामुळे संघातील खेळाडूही तुमच्यासोबत दुजाभाव करतात, असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केलाय. मॅनचेस्टर युनाइटेड आणि इंग्लंडचे फुटबॉलपटू मार्क्‍स रशफोर्ड यांनी देखील जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. आताचा समाज पूर्वीपेक्षा अधिक विभागणी झालेला वाटतो, अशा शब्दांत त्यांनी वर्णभेदाच्या मुद्यावर भाष्य केले आहे.  

संगकारा म्हणाला, गोंधळ धोनीमुळे झाला नव्हता तर...

क्रिकेटच्या इतिहासा ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू अँड्रू सायमंडच यानेही वर्णभेदीच्या मुद्याचा शिकार झाल्याचे म्हटले होते. मागील वर्षी इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चर याला काळा-गोरा या वर्णभेदाच्या मुद्यावरुन लक्ष्य करण्यात आले होते. जोफ्राला डिवचल्यानंतर न्यूझीलंड बोर्डाने आपल्या चाहत्यावर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सामने मैदानात येऊन पाहण्यावर दोन वर्षांची बंदी घातली होती.  


​ ​

संबंधित बातम्या