इयोन मॉर्गनच्या मते या कारणांमुळे यावर्षी टी-20  विश्वचषक होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान टी20 विश्वचषक आयोजन करण्यात येणार होते.

इंग्लडच्या एकदिवसीय तसेच टी20 संघाचा कर्णधार इयोन मॉर्गन याला यंदा ऑस्ट्रेलियात आयोजीत करण्यात येणार टी20 विश्वचषक पुर्वनियोजित ठरल्याप्रमाणे होणे शक्य नाही, ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्यांदा कोरोना व्हायरस पसरण्याची भितीपोटी आयोजन रद्द करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान टी20 विश्वचषक आयोजन करण्यात येणार होते, पण कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सध्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ऑस्ट्रेलिया मध्ये देशाच्या सिमा बंद केल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकारी यंत्रणाना य़श आले होते. “स्पर्धेचे आयोजन ठरल्याप्रमाणे झाले तर तो माझ्यासाठी धक्का असेल” असे मत मॉर्गन याने पत्रकारांशी बोलताना सांगीतले आहे.” ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखला आहे त्यावरुन सर्व देशांच्या अगोदर त्यांनी देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी असून मोजक्याच नागरीकांनी जीव गमावला आहे” असेही मॉर्गनने यावेळी नमूद केले. 

"2022 पर्यंत स्थगीत होणार टी-20 विश्वकप?"

ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास सात हजारपेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 6 हजार 500  रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत तर शंभर लोकांनी जीव गमावला आहे. मॉर्गनने सांगीतले की. “ त्यांच्या छोट्याशा निर्णयामे कोरोना रुग्ण वाढू शकतात, आणि जर कोरोना परत पसरण्यास सुरुवात झाली तर रुग्णांची प्रतिकारक शक्ती कशी असेल ते देखील सांगणे कठीण आहे.” त्यापुढे तो म्हणाला की, “जर जगभरातील संघ खेळण्यासाठी एकत्र आले आणि त्यादरम्यान दुसऱ्यांदा जर कोरोना व्हायरस पसरण्याचा शक्यत्ता वाढलेली असेल, त्यामुळे विश्वचषक खेळण्याची शक्यता कमी आहे.”
 


​ ​

संबंधित बातम्या