विल्यम्स भगिनींचीही सिनसिनाटीतून माघार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 August 2021

अमेरिकेच्या दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि तिची मोठी बहीण व्हीनस तसेच सोफिया केनिन यांनी मंगळवारी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. सेरेना आणि केनिन जखमी आहेत; परंतु व्हीनस विल्यम्सने माघार घेण्याचे कारण उघड केलेले नाही.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि तिची मोठी बहीण व्हीनस तसेच सोफिया केनिन यांनी मंगळवारी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. सेरेना आणि केनिन जखमी आहेत; परंतु व्हीनस विल्यम्सने माघार घेण्याचे कारण उघड केलेले नाही. 

उजव्या पायाच्या दुखापतीमुळे सेरेनाने २९ जून रोजी विम्बल्डनमध्ये पहिल्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतल्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. ती सिनसिनाटी ओपनची दोनदा विजेती आहे. ‘पायाच्या दुखापतीतून अजूनही सावरली नसल्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान सिनसिनाटी कोर्टवर मला पाठिंबा देणाऱ्या चाहत्‍यांची आठवण होईल. लवकरच बरी होऊन कोर्टवर उतरेल,’ असे तिने म्हटले आहे.

या अगोदर पुरुषांच्या गटात रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांनी शनिवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेण्‍याचा निर्णय घेतला होता.


​ ​

संबंधित बातम्या