टेनिसच्या पत्रकार परिषदेत ओसाकाला अश्रू अनावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 August 2021

महिला टेनिस स्टार नाओमी ओसाका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसल्यामुळे तिने माघार घेतली होती. त्यानंतर आता झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतही तिला अश्रू अनावर झाले.

मासन - महिला टेनिस स्टार नाओमी ओसाका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसल्यामुळे तिने माघार घेतली होती. त्यानंतर आता झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतही तिला अश्रू अनावर झाले.

फ्रेंच ओपननंतर ती मायदेशात झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खेळली, परंतु सिनसिनाती ओपन स्पर्धेद्वारे ती प्रथमच व्यावसायिक स्पर्धेत उतरली आणि पहिल्याच पत्रकार परिषदेत तिला रडू कोसळले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या पत्रकार परिषदेत पॉल डॉघर्टी यांनी, प्रतिथयश खेळाडू आणि मीडियाशी न बोलणे याचा समतोल कसा साधला जाऊ शकतो, तसेच तू खेळाच्या प्लॅटफॉर्मवर इतरही गोष्टींना प्राधान्य देत असतेस, हे योग्य आहे का, असा प्रश्न विचारला. दोन्ही गोष्टींचा कसा समतोल साधायचा हे मला माहीत नाही, असे उत्तर ओसाकाने दिले. दुसऱ्या पत्रकाराने तिला टेनिसबाबत प्रश्न विचारताच ओसाका रडू लागली.


​ ​

संबंधित बातम्या