US OPEN 2020: थीमनं फायनल जिंकली; ग्रँडस्लॅम स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 14 September 2020

अमेरिकन ओपनपूर्वी  ज्वेरेव आणि थीम यांच्यात 9 सामने खेळवले गेले होते. यात थीमने 7 तर ज्वरेवने 2 सामने जिंकले होते. ज्वेरेवने चांगली सुरुवात करत मोठा उलटफेर करण्याचे संकेत दिले होते. पण..

न्यूयॉर्क :  कोरोनाच्या प्रादुर्भावात अमेरिकेत रंगलेल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीत त्याने  जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचा 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 असा पराभव केला. सहा वर्षानंतर युएई ओपनमध्ये नवा गडी नव राज्य आल्याचं पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच युएस ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती. 23 वर्षीय ज्वेरेवच्या करियरमधील ही पहिली ग्रँडस्लॅम फायनल होती. तर 27 वर्षीय थीम युएस ओपनच्या फायनलमध्ये पोहचणारा  ऑस्ट्रियाचा दुसरा खेळाडू होता. 

प्रत्येक सामन्यानंतर कोबे ब्रायंटची जर्सी का घातली? नाओमीने केला खुलासा

या स्पर्धेतील विजयासह नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या खेळाडूने ग्रँडस्लॅम जिंकण्याचा नवा विक्रमही त्याने प्रस्थापित केला. फेडरर, जोकोविच, नदार या त्रिकुटांशिवाय होणाऱ्या अमेरिकन ओपनच्या फायनल या दोघांमध्ये पक्की झाल्यानंतर हा विक्रम होणार हे निश्चित झाले होते. यापूर्वी 63 ग्रँडस्लॅम विजेते हे 80 च्या दशकात जन्मलेले आहेत.  अमेरिकन ओपनपूर्वी  ज्वेरेव आणि थीम यांच्यात 9 सामने खेळवले गेले होते. यात थीमने 7 तर ज्वरेवने 2 सामने जिंकले होते. ज्वेरेवने चांगली सुरुवात करत मोठा उलटफेर करण्याचे संकेत दिले होते. मात्र अनुभवाच्या जोरावर पिछाडीवर असतानाही थीमने बाजी पलटली. 0-2 अशा फरकाने तो पिछाडीवर होता. मात्र अखेर त्याने सामना आपल्या खिशात घातला.  पाचव्या सेटमध्ये दोघांमध्ये चांगली टक्कर झाल्याचे पाहायला मिळाली. लढत  6-6 अशी बरोबरीत आली. अनुभवाच्या जोरावर थीमने सामना आपल्या बाजूने खेचत पहिल्यांदा युएस ओपनवर नाव कोरले.  

नाओमीने दुसऱ्यांदा जिंकली अमेरिकन ओपन; अझारेंकाचं स्वप्न पुन्हा अधुरं

अमेरिकन ओपनमध्ये 16 वर्षांत पहिल्यांदा  नोवाक जोकोविच, राफेल नदाल  आणि रॉजर फेडरर यांच्याशिवाय फायनलचा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. नदालने कोरोनामुळे सामन्यातू माघार घेतली होती. तर जेतेपदाचा प्रमुख दावेदार जोकोविचने रागाच्या भरात मारलेला चेंडू महिला अधिकाऱ्याला लागल्यानंतर त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. रॉजर फेडररने दुखापतीमुळे यंदाच्या कोणत्याही ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.   


​ ​

संबंधित बातम्या