ऑस्ट्रेलियन ओपन 2020 : सुमित नागलला वाईल्ड कार्ड एन्ट्री

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलला 8 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे.

भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलला 8 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आयोजकांनी अद्याप एकेरीसाठी वाइल्ड कार्डमध्ये प्रवेश मिळविलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली नसली तरी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सुमित नागलला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आल्याचे सांगितले आहे. 

Australian Open 2020 : फेडरर दुखापतीतून अजून सावरलेला नाही, स्पर्धेतून घेतली...

सुमित नागलने सोशल मीडियावरील ट्विटर याबाबतचे ट्विट करत, ऑस्ट्रेलियन ओपनसाठी वाइल्ड कार्ड मिळविण्यात मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. तसेच कोरोनाजन्य परिस्थितीत देखील ऑस्ट्रेलियन टेनिस ओपन स्पर्धा आयोजित करण्याबद्दल सुमित नागलने आयोजकांचे आभार मानले आहेत. सुमित नागलसह ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरेला देखील यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. 

दरम्यान, सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा रॉजर फेडरर दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.  रॉजर फेडररने काही दिवसांपूर्वीच सरावाला सुरुवात केल्यामुळे तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण आता तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.         


​ ​

संबंधित बातम्या