रामकुमार रामनाथन वाढदिवशी उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

रामकुमार रामनाथनला पुन्हा एटीपी चॅलेंजर मालिकेतील स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

एकेंताल : रामकुमार रामनाथनला पुन्हा एटीपी चॅलेंजर मालिकेतील स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याच्या 26 व्या वाढदिवशीही त्याला अंतिम फेरीतील पराभवाची मालिका खंडित करता आली नाही.

एकेंताल चॅलेंजरच्या अंतिम फेरीत रामकुमार अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डा याच्याविरुद्ध पराजित झाला. जागतिक क्रमवारीत 135 वा असलेला रामकुमार 4-6, 4-6 असा पराजित झाला. एक तास 23 मिनिटांच्या या लढतीत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावण्यास तो अपयशी ठरला.

फ्रेंच फुटबॉल लीग : डी मारियोच्या दोन गोलमुळे पीएसजीचा रेनेसवर विजय   

चॅलेंजर मालिकेतील पाचव्या अंतिम लढतीत रामकुमार पराजित झाला. त्याने एकही अंतिम लढत जिंकलेली नाही. यापूर्वी त्याला ताल्लाहास्सी (एप्रिल 2017), विन्नेत्का (जुलै 2017), पुणे (नोव्हेंबर 2017) आणि तैवान (एप्रिल 2018) मध्येही अंतिम लढतीत पराजित झाला होता. ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याला 7200 युरोसह 60 मानांकन गुण मिळाले. त्यामुळे त्याने जागतिक क्रमवारीत 206 वरून 185 व्या क्रमांकापर्यंत प्रगती केली.


​ ​

संबंधित बातम्या