Australian Open 2020 : फेडरर दुखापतीतून अजून सावरलेला नाही, स्पर्धेतून घेतली माघार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

20 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता फेडरर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरेल, असा विश्वासही प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आलाय.

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन  ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या कोर्टवर उतरणार नाही. नव्या वर्षात होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तो खेळणार असल्याची जोरदार चर्चा यापूर्वी रंगली होती. पण आता तो खेळणार नसल्याचे समोर येत आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन फेडरर खेळणार नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे. त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो स्पर्धेत खेळणार नसल्याचे कारणही देण्यात आले आहे.  गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो व्यावसायिक टेनिसच्या कोर्टपासून दूर आहे. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे तो फेब्रुवारीपासून कोर्टपासून दूर होता. त्याने सरावाला सुरुवात केल्यामुळे तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली. पण आता तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

20 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता फेडरर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरेल, असा विश्वासही प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आलाय. 39 वर्षीय फेडरर टेनिस जगतातील लोकप्रिय खेळाडू आहे. राफेल नदालसह त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. दुखापतीमुळे आता  राफेल नदालला त्याला ओव्हरटेक करण्याची आणखी एक संधी निर्माण झाली आहे. 8 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.  


​ ​

संबंधित बातम्या