ऑस्ट्रेलियन ओपन 2021: रॉजर फेडररसह दिग्गज टेनिसपटू उतरणार मैदानात
टेनिसचा अनभिषज्ञ सम्राट म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांनी नवीन वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार आहे.
टेनिसचा अनभिषज्ञ सम्राट म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांनी नवीन वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार आहे. टेनिस क्षेत्रातील या दोन खेळाडूंसह अव्वल महिला टेनिसपटू अश्ले बार्टी आणि आठ वेळेस ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर मोहर उठवलेल्या सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच देखील ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर उतरणार आहे. यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 8 ते 21 फेब्रुवारी मध्ये खेळवण्यात येणार आहे.
LOOK BACK 2020: क्रिडा विश्वातील 'या' दिग्गज खेळाडूंनी घेतला जगाचा...
रॉजर फेडररने आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे यावर्षी झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. व त्यामुळे गुडघ्याच्या दोन शस्त्रक्रिया झालेला रॉजर फेडरर आगामी वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा देखील मुकणार असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र त्याने दुबईत पुन्हा सराव सुरु केल्याची माहिती मिळाली असून, तो मेलबर्न येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळणार आहे.
तसेच, ऑस्ट्रेलियन ओपनचे आठ वेळेस महिला सिंगल्सचे विजेतेपद मिळवलेल्या सेरेना विल्यम्सने आगामी ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. व यासोबतच ती सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या मार्गरेटच्या 24 ग्रँडस्लॅम विक्रमाशी बरोबरी करण्याच्या हेतूने या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर महिलांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली सिमोना हालेप, यंदाची यूएस ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका, गतविजेती सोफिया केनिन, एलेना स्वितोलिना, कॅरोलिना पिस्कोव्हा, बियान्का अँअँड्रीस्कु, पेट्रा क्विटोव्हा, किकी बर्टेन्स आणि आर्या सबालेन्का आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मैदानावर उतरणार आहेत.
ठरलं तर मग; 2022 पासून आयपीएलमध्ये अतिरिक्त दोन संघ
तर, पुरुषांच्या सिंगल्स मध्ये रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यासह राफेल नदाल, डॉमिनिक थिएम, डॅनिल मेदवेदेव, स्टीफनोस सितिपास, अलेक्झांडर ज्वेरेव्ह, आंद्रे रुबलेव्ह, डिएगो शार्टझमन आणि मार्टिओ ब्रेटिनी हे टेनिसपटू सुद्धा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेणार आहेत.
DOMINANCE @DjokerNole, @serenawilliams and @rogerfederer will start #AO2021 with a remarkable 21 #AusOpen singles titles between them. Will more history be made in February?
— #AusOpen (@AustralianOpen) December 23, 2020
See you in Melbourne #AO2021@ashbarty and @DjokerNole will lead the fields at what promises to be a historic #AusOpen at Melbourne Park from 8-21 February 2021.
— #AusOpen (@AustralianOpen) December 24, 2020
दरम्यान, यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून 14 दिवस मेलबर्नमध्ये क्वारंटाईन रहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रशासनाने याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वीच दिली होती. व सर्व खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले होते. तर ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी सर्व खेळाडूंना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. आणि त्यानंतर मेलबर्न येथे दोन आठवड्यांमध्ये सर्व खेळाडूंची पाच वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.