French Open: राफेल नदाल पुन्हा ठरला क्ले कोर्टचा बादशहा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 11 October 2020

सध्याच्या घडीचे आघाडीचे दोन टेनिसपटू पुन्हा एकदा फ्रेंच ओपनच्या निमित्ताने भिडत असल्याने आजचा सामना रंगतदार होईल, अशी टेनिस चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, क्ले कोर्टवरची ही लढत एकतर्फीच झाली. ज्योकोविचने अक्षरशः सामन्यात प्रतिकारच केला नसल्याचं जाणवलं

French Open:क्ले कोर्टचा बादशहा म्हणून ओळख असलेल्या राफेल नदालने आज, पुन्हा एकदा आपण या कोर्टवरचे निर्विवाद सम्राट असल्याचं सिद्ध केलं. प्रतिस्पर्धी नोवक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत फ्रेंच ओपनला गवसणी घातली. नदालचे हे 20वे ग्रँड स्लॅम विजेतेपद असून, 13वे फ्रेंच ओपन विजेतेपद आहे. या विजयानं नदालनं रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केलीय. 

सध्याच्या घडीचे आघाडीचे दोन टेनिसपटू पुन्हा एकदा फ्रेंच ओपनच्या निमित्ताने भिडत असल्याने आजचा सामना रंगतदार होईल, अशी टेनिस चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, क्ले कोर्टवरची ही लढत एकतर्फीच झाली. ज्योकोविचने अक्षरशः सामन्यात प्रतिकारच केला नसल्याचं जाणवलं. नदालनं आपल्या खेळाच्या जोरावर पहिला सेट 6-0 असा खिशात घातला होता. ज्योकोविचनं गेल्या अनेक वर्षांत पहिला सेट 0-6 असा गमावण्याचीही बहुदा पहिलीच वेळ असावी. त्यानंतरही दुसरा सेट नदालनं 6-2 असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये ज्योकोविचकडून थोडाफार प्रतिकार झाला. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तिसरा सेट 7-5 असा जिंकत नदालनं सामना खिशात घातला. 

French Open 2020 : 19 वर्षांच्या पोरीची कमाल, ऐतिहासिक कामगिरीसह जेतेपदावर कोरलं नाव

विशेष म्हणजे, टेनिस कोर्टवरील दोन तोडीचे प्रतिस्पर्धी असलेले नदाल आणि ज्योकोविच आठ वेळा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये आमने-सामने आले होते.  
आठ वेळ ग्रँड स्लॅम फायनल 

नदाल विरुद्ध ज्योकोविच 
एकूण सामने - 56 
ज्योकोविच - 29 
नदाल - 27

फायनल - 27
ज्योकोविच - 15 
नदाल - 12

फ्रेंच - 3 
नदाल - 3 
ज्योकोविच - 0 

नदालची ग्रँडस्लॅम कामगिरी
ऑस्ट्रेलियन ओपन - 9 
फ्रेंच ओपन - 13 
विम्बल्डन - 2 
अमेरिकन ओपन - 4  


​ ​

संबंधित बातम्या